आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रीटमेंटसाठी परदेशी जाणार आहे 51 वर्षांचा अक्षय कुमार, उन्हाळा सुरु होताच दरवर्षी घेतो या थेरेपीचा आधार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अक्षय कुमार लवकरच हाइड्रोथेरेपी ट्रीटमेंटसाठी जर्मनीला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रत्येकवर्षी उन्हाळ्यामध्ये अक्षय ही थेरेपी घेण्यासाठी तिथे जातो. यावर्षीच्या थेरेपीसाठी तो पुढच्या तीन दिवसात जर्मनीसाठी रवाना होऊ शकतो. स्वतःला फिट तंदुरुस्त ठेवण्यासाठी अक्षय ही ट्रीटमेंट घेत असतो. कारण अक्षय बॉलिवूडच्या त्या स्टार्समध्ये सामील आहे, जे आपले जास्तीत जास्त स्टंट स्वतः करणे पसंत करतात. 51 वर्षांच्या वयातही तो रिस्क घ्यायला घाबरत नाही. त्याची फिल्म 'केसरी' मधेच पहिले तर या फिल्मचे अनेक अॅक्शन सीन त्याने स्वतःच केले आहेत. यामध्ये रोप क्लाइम्बिंग हा सीनदेखील सामील आहे. 

थकवा आणि आळस घालवण्याचा मार्ग आहे ही हाइड्रोथेरेपी... 
हाइड्रोथेरेपीमध्ये पाण्याच्या मदतीने सर्व समस्यानाचे निराकरण केले जाते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात ही थेरेपी प्रत्येक काम करणाऱ्या माणसासाठी थकवा आणि आळस घालवण्याचा मार्ग आहे. याने केवळ पूर्ण बॉडी व्यवस्थित आणि रीसेट होते असे नाही तर बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठीही फायदेशीर असते. रिपोर्ट्सनुसार, तो प्रत्येक नॅशनल-इंटरनॅशनल स्टार या थेरेपीचा आधार घेतो, जो आपले स्टंट स्वतः करणे पसंत करतो. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर अक्षय कुमारची 'केसरी' आत्ताच रिलीज झाली आहे. त्याचे तीन चित्रपट 'मिशन मंगल', 'गुड न्यूज' आणि 'हाउसफुल 4' सध्या फ्लोरवर आहेत. 

बातम्या आणखी आहेत...