Home | Gossip | akshay kumar is playing kings roll in his next film 'house full 4'

'हाउसफुल 4' चित्रपटात 16 व्या शतकातील राजा साकारणार अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओलही दिसणार 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 15, 2019, 01:21 PM IST

‘गुड न्यूज'मध्ये अक्षयसोबत दिसणार अंजना सुखानी...  

 • akshay kumar is playing kings roll in his next film 'house full 4'

  एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमारचा '‘केसरी’' नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर लगेच तो '‘सूर्यवंशी'च्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. याबरेाबरच त्याने ‘हाउसफुल 4’ची तयारीदेखील सुरू केली आहे. सध्या त्याच्या हातात बरेच प्रोजेक्ट आहेत. ‘हाउसफुल 4’मधून अक्षय आपल्या चाहत्यांना हसवण्याची तयारी करत आहे. सूत्राच्या माहितीनुसार... या चित्रपटात अक्षय महाराजाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दाेन भाग असतील. एका भाग नव्या जमान्याचा असेल तर दुसरा फ्लॅशबॅकमध्ये दाखवला जाईल.

  रितेश, बॉबी होतील दरबारी...
  एकीकडे अक्षय महाराजाच्या भूमिकेत असेल, तर रितेश देशमुख आणि बॉबी देओल त्याच्या दरबारीच्या भूमिकेत दिसणार आहेत. कृती सेनन, कृती खरबंदा आणि पूजा हेगडे तिघी राजकुमारीच्या भूमिकेत दिसतील. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरुन एक फोटो व्हायरल झाला होता. यात अक्षय कुमार राजाच्या गेटअपमध्ये होता. अक्षय यात 16 व्या शतकाच्या राजाची भूमिका करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे

  ‘गुड न्यूज'मध्ये अक्षयसोबत दिसणार अंजना सुखानी...
  अक्षय कुमार आणि करिना कपूर अभिनीत 'गुड न्यूज’' चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे. ‘गोलमाल’ फेम अभिनेत्री अंजना सुखानी यात मुख्य भूमिकेत आहे. खरं तर तिच्या पात्राविषयी आणखी माहिती मिळालेली नाही. अक्षय आणि करिनाने आपल्या वाट्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. मुलांसाठी अनेक गोष्टींचा सामना करणाऱ्यावर जोडप्यावर चित्रपट आधारित आहे. चित्रपट 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल.

Trending