आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar, John Abraham And Many More Bollywood Celebrities Who Not Drinks Liquor

मद्यापासून चार हात लांबच राहतात बॉलिवूडचे हे \'Desi Boys\', या 8 सेलिब्रिटींनाही नाहीये दारुचे व्यसन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - अभिनेता अक्षय कुमारचा 'गोल्ड' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' हे चित्रपट 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले. पहिल्याच दिवशी या दोघांच्याही चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवला. एकीकडे 'गोल्ड'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 27 कोटी राहिले, तर 'सत्यमेव जयते'ने पहिल्या दिवशी 18 कोटींची कमाई केली. रमेश बाला यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितल्यानुसार, 'गोल्ड' हा चित्रपट अक्षय कुमारच्या फिल्मी 

करिअरमधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. हीच गोष्ट जॉन अब्राहमलाही लागू पडते. त्याच्या आजवरच्या कुठल्याही चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 18 कोटींची कमाई केलेली नाही. 'गोल्ड' हा चित्रपट रिमा कागती यांनी तर 'सत्यमेव जयते' मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केला आहे.  

 

अक्षय आणि जॉन हे ख-या आयुष्यातही चांगले मित्र आहेत. या दोघांमध्ये साम्य असणारी एक गोष्ट म्हणजे दोघेही फिटनेसवर लक्ष देतात. बी टाऊनच्या फिट अभिनेत्यांमध्ये अक्षय आणि जॉनच्या नावाची गणना होते. वेळेत झोपणे सकाळी लवकर उठणे हे दोघे पसंत आहे. हे दोन्ही स्टार्स स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतो. अक्षय आणि जॉन स्वतः दारुपासून दूर ठेवतात आणि बॉलिवूडचे हे देसी बॉईज तरुणाईलासुद्धा हाच सल्ला देतात. 

 

एका मुलाखतीत जॉन म्हणाला होता, की तो केवळ एक अभिनेता किंवा मॉडेलच नाहीये, तर देशातील तरुणांसाठी एक रोल मॉडेलसुद्धा आहे. त्यामुळे जबाबदारीची जाणीव असल्याने तो कधीच सिगारेट किंवा दारुच्या जाहिराती स्वीकारत नाही.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अक्षय आणि जॉन यांच्याप्रमाणेच दारुपासून लांब राहणाऱ्या बॉलिवूड सेलेब्सविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...