आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  •  Akshay Kumar, Kareena Kapoor, Diljit Dosanjh Kiara Advani Starrer   Good News Collection

अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज'ची छप्परफाड कमाई, 6 दिवसांत जमवला 117 कोटींचा गल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई 117.10 कोटी रुपये झाली आहे.

बॉलिवूड डेस्कः 'गुड न्यूज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजित दोसांझ आणि कियारा अडवाणी स्टारर या चित्रपटाने बुधवारी 22.50 कोटींचा व्यवसाय केला. यासह बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई 117.10 कोटी रुपये झाली आहे. या चित्रपटाद्वारे राज मेहता यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे.

  • असे आहे चित्रपटाचे दररोजचे कलेक्शन
दिवसकमाई
27 डिसेंबर 2019 (शुक्रवार)17.56 कोटी रुपये
28 डिसेंबर 2019 (शनिवार)21.78 कोटी रुपये
29 डिसेंबर 2019 (रविवार)25.65 कोटी रुपये
30 डिसेंबर 2019  (सोमवार)13.41 कोटी रुपये
31 डिसेंबर 2019 (मंगळवार)16.20 कोटी रुपये
1 जानेवारी 2020 (बुधवार)22.50 कोटी रुपये
एकुण कलेक्शन117.10 कोटी रुपये
  • 2019 मध्ये आलेल्या अक्षयच्या चारही चित्रपटांनी ओलांडला 100 कोटींचा पल्ला

अक्षय कुमारचे चार चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाले होते आणि बॉक्स ऑफिसवर सर्वांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. सर्वांचे एकुण मिळून कलेक्शन हे 677.18 कोटी झाले आहे. 'गुड न्यूज'ची कमाई अद्याप सुरु आहे.  

  • चारही चित्रपटांचे कलेक्शन चित्रपट रिलीज डेट लाइफटाइम कलेक्शन केसरी 21 मार्च 2019 154.41 कोटी रुपये मिशन मंगल 15 ऑगस्ट 2019 211.07 कोटी रुपये हाऊसफुल 4 25 ऑक्टोबर 2019 194.60 कोटी रुपये गुड न्यूज 27 डिसेंबर 2019 117.10 कोटी रुपये
बातम्या आणखी आहेत...