आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदी चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे गुज न्यूज, कथा अशी की हसून हसून प्रेमात पडाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग4.5/5
स्टारकास्टअक्षय कुमार, करीना कपूर खान, किआरा आडवाणी, दिलजीत दोसांझ,आदिल हुसैन, टिस्का चोप्रा
दिग्दर्शकराज मेहता
निर्माताहीरू यश जोहर, अरुणा भाटिया, करन जोहर, अपूर्वा मेहता, शशांक खेतान
संगीतकारतनिष्क बागची, रोचक कोहली, लॉव, बादशाह, सुखबीर
जोनरकॉमेडी
कालावधी133 मिनिटे

बॉलिवूड डेस्कः ज्योती कपूर लिखित आणि राज मेहता दिग्दर्शित ‘गुड न्यूज’ या शीर्षकातच सर्वकाही सामावले आहे. त्यात हसू, आनंद, भावना आणि विचारांचे परिपूर्ण आणि स्मार्ट पॅकेज आहे. हा एक उत्कृष्ट दर्जाचा मनोरंजक चित्रपट बनला आहे ज्याला उत्कृष्ट लेखन आणि अभिनयची साथ मिळाली आहे. 'विक्की डोनर' आणि 'बधाई हो' नंतर हा आणखी एक मेडिकल ह्युमर आहे. मेकर्सनी संदेश आणि करमणुकीचा एक प्रभावी घुटी बनवली आहे.  

  • अशी येते बत्रा कुटुंबियांकडे गुड न्यूज
  • ही कथा मुंबई आणि चंदीगडच्या बत्रा जोडप्याची आहे. मुंबईतील वरुण (अक्षय कुमार) आणि दीप्ती बत्रा (करीना कपूर खान) आहेत. तर चंडीगडमधील हनी (दिलजित दोसांझ) आणि मोनिका बत्रा (कियारा अडवाणी) आहेत. लग्नाला सात वर्षे झाली तरी ही दोन्ही जोडपे मूलहीन आहेत. यामुळे वारस आणण्याचा कुटुंबाचा त्यांच्यावर खूप दबाव आहे. शेवटी, ते डॉक्टर जोशी दाम्पत्य (आदिल हुसेन-टिस्का चोप्रा) कडे आयव्हीएफ उपचार घेतात. परंतु बत्रा याच आडनावामुळे त्यांच्या शुक्राणूची देवाणघेवाण झाल्याचे उघडकीस आल्यावर या जोडप्यांच्या जीवनात एक वादळ येते. वरुणला काय करावे हे समजत नाही. तर दीप्तीसुद्धा गर्भपात करण्याचा निर्णय घेते. परंतु हनी आणि मोनिका तिला असे करण्यापासून थांबवतात. शेवटी त्या जोडप्यांचे आयुष्य कसे वळते याविषयी हा चित्रपट आहे.

  • गर्भावस्था केंद्रस्थानी ठेवून ज्योती कपूर यांनी यापूर्वी ‘बधाई हो’ची कथा देखील लिहिली होती. वृद्ध स्त्रीच्या गरोदरपणाबद्दल एक टॅबू होता. येथे नि: संतान जोडप्यांवरील सामाजिक दबावाचा टॅबू आहे. ऋषभ शर्मा आणि नवोदित दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमवेत ज्योती कपूर यांनी कथा, पटकथा आणि संवादातून हास्य निर्माण केले आहे. सर्व पात्रे हजरजबाबी आहेत, जी चित्रपटाची ताकद आहे. प्रत्येक संवाद आणि परिस्थिती हास्याचा स्फोट निर्माण करते. हे सर्वात कठीण कार्य असते, परंतु लेखक आणि दिग्दर्शकांनी ते लिलया पेलले आहे. केवळ आई बनून स्त्री पूर्ण होऊ शकते का? हा विचार नक्कीच मनात डोकावतो. पण या विचारात खोलवर जाण्याऐवजी वरुण आणि दीप्ती यांच्या जीवनात जबरदस्तीने हस्तक्षेप करणार्‍या हरमन आणि मोनिकावर या चित्रपटाचे लक्ष केंद्रित केले आहे. हरमन आणि मोनिकामुळे वरुण आणि दीप्ती यांचे आयुष्य एक प्रकारे 'हराम' झाले आहे. संपूर्ण चित्रपट हास्याचा एक भारी डोस देतो.

  • अक्षय, करीना, दिलजित आणि कियारा यांनी त्यांची पात्रं खूपच चांगली साकारली आहेत. प्रत्येकाने सहजतेने पात्रांना आत्मसात केले आहे. डॉक्टर जोशी जोडपे म्हणून आदिल हुसेन आणि टिस्का चोप्रा देखील या मस्तीच्या पाठशाळेचे चांगले सहभागी आहेत. संवाद शैलीसह नृत्य गाण्यातील सर्व कलाकारांची उर्जा सातवे आसमानवर आहे. प्रत्येकाची स्क्रीन उपस्थिती लक्ष वेधून घेणारी आहे. चांगल्या एडिटिंगमुळे चित्रपटाची अंतिम आवृत्ती ऋुटीहिन राहते. इंटरवलच्या आधी आणि नंतरही हा चित्रपट प्रभावी आहे.