आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Postponed His Film 'Bachchan Pandey's Release Date For Amir Khan's 'Lal Singh Chadha'

आमिरच्या विनंतीवर अक्षयने दाखवला मनाचा मोठेपणा, 'लाल सिंह चड्ढा'साठी बदलली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आमिर खानच्या रिक्वेस्टवर अक्षय कुमारने आपला चित्रपट 'बच्चन पांडे' ची रिलीज डेट एक महिना पुढे सरकवली आहे. आधी हा चित्रपट ख्रिसमसला आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा' सोबत रिलीज होणार होता. पण आता 22 जानेवारी 2021 ला रिलीज होणार आहे. झाले असे की, आमिरला हा  क्लॅश नको होता. त्याने अक्षय आणि चित्रपटाचे प्रोड्यूसर साजिद नाडियाडवालाला विनंती केली की, त्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे घ्यावी. या विनंतीचा दोघांनीही मनापासून स्वीकार केला.  


आमिरने ट्विटरवर दिली माहिती.
.. 


आमिरने ट्विटरवर याची माहिती देते लिहिले की, "कधी कधी एका बातचीतीने सर्वकाही सोपे होते. माझा मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्या रिक्वेस्टवर मनाचा मोठेपणा दाखवत आपला चित्रपट 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट पुढे सरकवली. मी त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा देतो."

आमिरच्या ट्वीटवर रिप्लाय करत अक्षयने लिहिले आहे, "काही हरकत नाही आमिर खान. आपण सर्व इथे मित्र आहोत." अक्षयने लिहिले आहे, "सादर आहे नवा लूक आणि रिलीज डेट. 22 जानेवारी 2021 ला 'बच्चन पांडे' मध्ये लीड रोलसोबत येत आहे."