आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयने मुलीला विचारले, 'तू सेल्फ डिफेंस शिकत आहेस', उत्तर ऐकून म्हणाला - मला तुझा अभिमान आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारने शनिवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर छोट्या मुलीसोबत बोलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिले, 'आपल्या महिला आत्मसुरक्षा केंद्राच्या ग्रॅज्युएशन - डेच्या निमित्ताने आज या मुलीला भेटून खूप आनंद झाला आणि जगाला पुढे घेऊन जाण्याचा तिचा हा आत्मविश्वासच आमच्या टीमचा निरंतर पुढे जाण्यास प्रेरित करत आहे.' आपल्या या ट्वीटला त्याने शिवसेना नेता आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील टॅग केले, जे स्वतःदेखील या प्रोग्राममध्ये उपस्थित होते. 

अक्षयने जो व्हिडिओ शेअर केला, त्यामध्ये तो मुलीला विचारतो की, तू सेल्फ डिफेंस का शिकतेस ? उत्तरात ती म्हणाली, 'कारण मला फुटबॉल खेळायला आवडते. मलादेखील त्याचा भाग बनायचे होते. पण बॉल पकडता येत नसल्यामुळे मी खेळू शकले नाही. तेव्हा मला माझी आई म्हणाली की, जर तू आत्मसुरक्षा करण्याचे शिकलास तर तू बॉलदेखील पकडू शकशील.' पुढे मुलगी म्हणाली, 'मी त्या मुलींशी (खिलाड़ियों) भांडू इच्छित नाही, पण त्यांना सांगू इच्छिते की, तुम्हीही माझ्यासोबत भांडू नका.'

अक्षय म्हणाला - 'आय एम प्राउड ऑफ यू'

मुलीचे बोलणे ऐकून अक्षय म्हणाला, 'मला तुझा अभिमान आहे.' मग आदित्य ठाकरे यांनी विचारल्यावर मुलगी म्हणाली, 'मी फुटबॉलमध्ये गोलकीपर आणि स्ट्रायकर म्हणू खेळते.' अक्षयच्या अपकमिंग चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याचा आगामी रिलीज चित्रपट 'सूर्यवंशी' आहे, जो 24 मार्चला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे 'लक्ष्मी बॉम्ब', 'बच्चन पांडे' आणि 'पृथ्वीराज' यासोबतच 'अतरंगी रे' देखील आहे. 

बातम्या आणखी आहेत...