आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या एवढ्या वर्षांनी अक्षयने त्याच्या सुखी वैवाहिक आयुष्याचे रहस्य उघड केले आहे. या कपलचा एक व्हिडिओ समोर आला असून यात अक्षय एका जोडप्याला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी टिप्स देताना दिसतोय. अक्षय म्हणतोय, "सोबत रहा पण चिकटू नका, नाहीतर तुटून जाल... थोडा वेळ स्वतःला द्या खुलून जाल." अक्षयचे हे उत्तर ऐकून त्याची पत्नी ट्विंकल इम्प्रेस झाल्याचे या व्हिडिओत बघायला मिळतंय. अक्षय आणि ट्विंकलचा हा व्हिडिओ एका फूड ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी शूट करण्यात आला होता. या व्हिडिओत अक्षय त्याच्या पत्नीसाठी तिची आवडती बिर्यानी बनवताना दिसतोय. खास गोष्ट म्हणजे या कपलचे वैवाहिक आयुष्य असेच सुरळित चालले आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने हा व्हिडिओ शेअर करुन सांगितले की, तब्बल 20 वर्षांनी तो त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीला डायरेक्ट करु शकला.
लग्नापूर्वी वर्षभर लिव्ह इनमध्ये होते अक्षय-ट्विंकल...
- अक्षय आणि ट्विंकल यांचे लग्न 17 जानेवारी 2001 रोजी झाले होते. ट्विंकल ही दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची थोरली लेक आहे.
- अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट एका फोटोशूटवेळी झाली होती. आई डिंपलने अक्षयकडे ट्विंकलसोबत लग्नापूर्वी एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे दोघांना लग्नापूर्वी वर्षभर लिव्ह इनमध्ये राहावे लागणार होते. जर वर्षभरात दोघांमध्ये बाँडिंग जुळली तर लग्नासाठी परवानगी देणार असल्याचे डिंपलने अक्षयला सांगितले होते. ही अट मान्य केल्यानंतर अक्षयचे ट्विंकलसोबत लग्न झाले.
- ट्विंकलने 2002 मध्ये मुलगा आरवला जन्म दिला. तर मुलगी निताराचा जन्म 2012 मध्ये झाला होता. निताराच्या जन्मापूर्वी ट्विंकलने अक्षयकडे अट ठेवली होती, त्याने चांगल्या विषयाच्या चित्रपटांची निवड करावी, तरच ती दुस-या बाळाचे प्लानिंग करेल. अक्षयने पत्नीचे म्हणणे ऐकून गांभीर्याने चित्रपटांची निवड करणे सुरु केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.