आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dimple Kapadia Dancing Italy Road Video, Son In Law Akshay Kumar Viral Saasu Maa Dance Video

व्हायरल व्हिडिओ : इटलीतील रस्त्यावर डान्स करताना दिसल्या अक्षय कुमारच्या सासूबाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सासूबाई डिंपल कपाडिया यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत डिंपल इटलीच्या रस्त्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. खास गोष्ट डिंपल यांच्यासाठी एक रोड साइड सिंगर गाणे म्हणत होता. 'बॉबी' या चित्रपटातील गाणे वाजताच 61 वर्षीय डिंपल स्वतःवर कंट्रोल ठेऊ शकल्या नाहीत आणि त्यांनी धमाल डान्स केला. हा व्हिडिओ स्वतः अक्षयने पोस्ट केला आहे. 14 तासांत हा व्हिडिओ 11 लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. 'हाउसफुल-4' या चित्रपटाचे जोधपूरचे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर अक्षय इटलीत त्याच्या कुटुंबीयांसोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे. पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगी नितारा, मुलगा आरव आणि सासूबाई डिंपल कपाडिया त्याच्यासोबत इटलीत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...