आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूड डेस्क - 15 ऑगस्ट रोजी खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित 'मिशन मंगल' चित्रपट प्रदर्शित होत आहे. अक्षयने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या बरेच चित्रपटांनी 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. दरम्यान माझ्या करिअरमध्ये ट्विंकलची महत्वाची भूमिका असल्याचे अक्षयचे म्हटले आहे.
तो म्हटला की, 'ट्विंकल अगोदर माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि मग पत्नी आहे. आवश्यकता असल्यास ती मला नेहमीच मार्गदर्शन करते. अनेकवेळा तिने दिलेला सल्ला माझ्यासाठी मोलाचा ठरला आहे.'
जे काम चांगले वाटते तेच कर
अक्षयने एका इंग्र्जी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझे करिअर उत्तम बनवण्यासाठी ट्विंकलची महत्वाची भूमिका राहिली आहे. मी प्रत्येक स्क्रिप्टबाबत विचारत नाही पण तरीही ती मला सल्ला देत असते. मी तिने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवतो. ती मला एकदा म्हणाली होती, प्रत्येक काम करण्याची आवश्यकता नाही. जे काम चांगले वाटले तेच करावे.
मिशन मंगलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे अक्षय
15 ऑगस्ट रोजी अक्षयचा 'मिशन मंगल' प्रदर्शित होत आहे. तो सध्या या चित्रपटाच्या प्रमोशन व्यस्त आहे. याच दिवशी जॉन अब्राहमचा 'बाटला हाउस' रिलीज होणार आहे. अक्षय रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'सोबतच लक्ष्मी बॉम्ब आणि हाउसफुल 4 मध्ये काम करत आहेत. हे सर्व सिनेमा 2020 पर्यंत प्रदर्शित होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.