आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. अक्षय कुमारच्या '2.0' चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टारवरुन सुपरव्हिलेन बनलेला अक्षय कुमार म्हणतो की, '2.0'च्या शूटिंग दरम्यान 38-40 दिवस त्याच्यासाठी खुप वेदनादायी होते. व्हिलेनच्या भूमिकेसाठी करावा लागणारा मेकअप यामागचे प्रमुख कारण होता. अक्षयने सांगितले की, मेकअपसाठी त्याला जवळपास साडे तीन तास बसावे लागत होते. तर मेकअप काढण्यासाठी अडीच तास लागत होते. अक्षयने आपल्या शूटिंगचा संपुर्ण अनुभव एका मुलाखतीदरम्यान शेअर केला.
काहीच खाण्याची परवानगी नव्हती
- अक्षयने सांगितले की, 38-40 दिवस जेवण्याची परवानगी नव्हती. अक्षयने सांगितले की, "जेव्हा आपण प्रोस्थेटिक मेकअपमध्ये येतो, तेव्हा तुम्हाला काहीच खाण्याची परवानगी नसते. तुम्हाला तुमची बॉडी संतुलित ठेवावी लागते. कारण बॉडीसूट तुमच्या साइजचा बनवण्यात आलेला असतो. तुम्ही फक्त लिक्विड डायटवर असता. फक्त मिल्कशेक, ज्यूस आणि पाणी पिण्याची परवानगी असते."
सर्व घाम मध्येच ठेवावा लागतो
- अक्षयने सांगितले की, शूटिंग दरम्यान 5-6 तास त्याला घाम बॉडीमध्येच ठेवावा लागत होता. तो म्हणतो की, "तुम्ही जेव्हा प्रोस्थेटिकसोबत शूट करत असता, तेव्हा आपल्या त्वेचेचे छिद्र श्वास घेऊ शकत नाही. कारण पुर्ण बॉडी पॅक असल्यामुळे ऑक्सीजन पोहोचू शकत नाही. यामुळे शूटच्या पाच-सहा तास मला पुर्ण घाम बॉडीमध्येच ठेवावा लागत होता आणि प्रोस्थेटिक काढताना मलाच माझ्या घामाचा वास यायचा."
पहिल्यांदा आपला लूक पाहून अक्षयने घेतला होता सेल्फी
- अक्षयने मुलाखतीत सांगितले की, "जेव्हा मी पहिल्यांदा माझा लूक पाहिला होता तेव्हा सेल्फी घेतला. माझे कुटूंब(बायको आणि मुलं) सोबत होते. यामुळे मी त्यांच्यासोबत सेल्फी घेतला." डायरेक्टर एस. शंकरचा हा चित्रपट 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात अक्षयसोबतच रजनीकांत आणि एमी जॅक्शन प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झालेल्या एंथिरन(रोबोट)चा सीक्वल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.