आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Shared The Poster Of 'Good News', Saying This Is Going To Be The Biggest Goof up Drama Of The Year ...

अक्षय कुमारने शेअर केले 'गुड न्यूज' चे पोस्टर, म्हणाला - या वर्षातील सर्वात मोठा गुफ-अप ड्रामा असणार आहे चित्रपट...  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' चे पोस्टर समोर आले आहे. सुपरस्टारने ट्विटरवर वेगवेगळे पोस्टर शेअर केले आहेत. यातील एकमध्ये तो दोन बेबी बम्प्सच्या मध्ये फसलेला दिसत आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, "ख्रिसमसच्या या सीजनमध्ये काही गुड न्यूज पसरवू. वर्षाच्या आगामी सर्वात मोठ्या गुफ-अपसाठी सोबत राहा."

चित्रपटाच्या इतर पोस्टर्सपैकी एकामध्ये दिलजीत दोसांझ अक्षय कुमारसारखीच पोज देत आहे. तर दुसऱ्यामध्ये अक्षयसोबत करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि किआरा आडवाणी दिसत आहेत.  

चित्रपटात अक्षय आणि अशा विवाहित जोडप्याच्या रूपात दिसणार आहेत जे बाळासाठी प्रयत्न करत असतात. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटातून राज मेहता दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहे. हीरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेतानने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.