आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Show This Photo To The Agency To Become The Model, After Seeing The Photo Everybody Rejected Him

मॉडेल बनण्यासाठी एजन्सीला हा फोटो दाखवायचा अक्षय कुमार, फोटो पाहताक्षणी केले जायचे रिजेक्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेला चित्रपट 'सूर्यवंशी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने आतपर्यंत 100 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. तसे तर अक्षयला मॉडेलिंग आणि चित्रपटात येण्याचे वेड लहानपणापासूनच होते. विशेषतः मॉडेल बनण्यासाठी त्याने वडिलांना न सांगता पैसे जमवून स्टूडियोमध्ये एक फोटो काढला होता आणि यालाच मॉडेलिंग एजन्सीजमध्ये दाखवून काम मागायचा. मात्र एजन्सीवाले त्याचा हा फोटो पाहताक्षणी त्याला रिजेक्ट करायचे. अक्षयने स्वतः फारुख शेखचा शो 'जीना इसी का नाम है' मध्ये याचा खुलासा केला होता.  तो म्हणाला होता की, त्या फोटोमुळे त्याला कधीच काम मिळायचेब नाही.   

 

जेव्हा वडिलांकडे व्यक्त केली होती अभिनेता बनण्याची इच्छा... 
'जीना इसी का नाम है' मध्ये अक्षयसोबत त्याची धाकटी बहीण अलकादेखील होती. त्याने सांगितले होते की, अक्षय तेव्हा सातवीमध्ये होता. जेव्हा त्याने वडिलांना हीरो बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. अलकानुसार, "जेव्हा हा 7 वीमध्ये होता तेव्हा चांगले मार्क्स आलें नाही. त्यामुळे वडिल याच्यावर चिडले होते आणि विचारले की, शिकायचे नाही तर आयुष्यात काय करायचे आहे ? हा खूप घाबरला आणि म्हणाला की, मी काही नाही बोलू शकत. यावर वडिल म्हणाले तू लिहून सांग. तेव्हा त्याने लिहिले की, मला हीरो बनायचे आहे. यावर वडिल म्हणाले की, या वयात हीरो बनायचे आहे ? काही शिक्षण पूर्ण कर, हिंदी, इंग्लिश काहीतरी यायला पाहिजे हीरो बनण्यासाठी."

 

अक्षय आणि त्याच्या मित्रांच्या ग्रुपचे नाव होते ब्लडी टेन... 
अक्षय दिल्लीमध्ये जन्माला आणि मुंबईच्या डॉन बास्को शाळेतून त्यांने शिक्षण पूर्ण केले. या शाळेत त्याने त्याच्या मित्रांना एक ग्रुप बनवला होता, ज्याचे नाव होते ब्लडी टेन. यामध्ये अक्षयसह 10 लोक होते. अक्षयनुसार, त्याच्या ग्रुपला शाळेतील सर्वचजण घाबरायचे. सर्व ग्रुप मेंबर्सला याचा गर्व वाटायचा.  

 

'जीना इसी का नाम है' मध्ये त्याच्या एका ग्रुप मेंबरने सांगितले होते की, बसमध्ये प्रवास करायचे तेव्हा अक्षय, संजय दत्तच्या पोस्टरकडे पाहून म्हणायचा, "मी एक दिवस त्याच्यासारखाच हीरो बनेल." अक्षयने सर्वात आधी डायरेक्टर प्रमोद चक्रवर्तीचा चित्रपट 'दीदार' (1992) साइन केला होता. पण राज शिप्पीच्या दिग्दर्शनात बनलेला 'सौगंध' आधी रिलीज झाला होता. त्यामुळे हा त्याचा डेब्यू चित्रपट मानला जातो. अक्षयला ओळख त्याचा तीसरा चित्रपट 'खिलाड़ी' (1992) ने मिळाली होती, जो अब्बास-मस्तानने दिग्दर्शित केला होता.  

बातम्या आणखी आहेत...