आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ट्रे्नमध्ये अक्षय कुमारच्या 16 वर्षांच्या मुलाने केला स्टंट, आई ट्विंकल म्हणाली, आत्या खूप घाबरली होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर तिचा थोरला मुलगा आरवचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत 16 वर्षीय आरव परेदशी एका ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसत आहे. ट्विंकलने कॅप्शनमध्ये लिहिले, "जुन्या ब्लॉकमधील एक टीप, ट्रेनमध्ये ट्रेनिंगचे प्रदर्शन करताना, माझी आत्या मात्र अतिशय घाबरलेली आहे." आरवचा हा व्हिडिओ 24 तासांत जवळजवळ 7 लाख लोकांनी बघितला आहे. आरव सध्या शिकतोय. सोबतच वडील अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल ठेवत तो मार्शल आर्टचे ट्रेनिंगही घेतोय. 


कुडोमध्ये ब्लॅक बेल्ट विजेता आहे आरव... 

- मे 2016 मध्ये आरवने कुडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला होता. अक्षय कुमारने 8 मे 2016 रोजी ट्वीट करुन याची माहिती दिली होती. त्याने लिहिले होते, "9 महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर माझ्या मुलाने कुडोमध्ये फर्स्ट डिग्रीचा ब्लॅक बेल्ट मिळवला आहे." तर ट्विंकलने हेच बेस्ट मदर्स डे गिफ्ट असल्याचे म्हटले होते. कुडो हे जापानमधील एक हायब्रिड मार्शल आर्ट आहे. 


15 सप्टेंबर रोजी आरवने साजरा केला 16 वा वाढदिवस... 
- आरवने 15 सप्टेंबर रोजी आपला 16 वा वाढदिवस साजरा केला. पहिल्यांदाच त्याच्या वाढदिवशी अक्षय मात्र त्याच्यासोबत नव्हता. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले होते, "15 वाढदिवस एकत्र साजरे केल्यानंतर पहिल्यांदाच एकमेकांपासून दूर... बर्थडे बॉयची खूप आठवण येतेय." याशिवाय आरवचे कौतुक करताना अक्षयने लिहिले होते, "माझ्यापेक्षा उंच, माझ्यापेक्ष धनवान, माझ्यापेक्षा चांगला... माझी प्रार्थना आहे, की तू अशीच प्रगती करत राहा."

 

बातम्या आणखी आहेत...