आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर्यवंशी'चा 4 मिनिटांचा दमदार ट्रेलर आला रे आला... सुर्या, सिंघमसोबत सूर्यवंशीचा अॅक्शन मोड ऑन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाच्या चार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सिंबा म्हणजेच रणवीर सिंह, सिंघम म्हणजे अर्थातच अजय देवगण आणि सूर्यवंशी म्हणजे अक्षय कुमारचा दमदार अंदाज बघायला मिळत आहे.    

चित्रपटाचे कथानक मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि ही शक्यता रोखण्यासाठी अक्षय कुमारचे आगमन होते. 1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटात केवळ एक किलो विस्फोटकं वापरण्यात आली होती. आजही मुंबईत 600 किलो विस्फोटकं कुठेतही लपवून ठेवण्यात आली आहेत. ही विस्फोटकं शोधण्याच काम अक्षय कुमार करताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. अक्षय, अजय आणि रणवीरसह अभिनेत्री कतरिना कैफ आणि जावेद जाफरी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.  ट्रेलरवरुन चित्रपटाविषयीची उत्कंठा नक्कीच वाढत आहे.

चित्रपटात ऐकायला मिळतील हे दमदार डायलॉग्स


24 मार्च रोजी रिलीज होत असलेल्या 'सूर्यवंशी' मध्ये अनेक दमदार संवाद ऐकायला मिळणार आहेत.  ट्रेलरमधील काही संवाद: 


1. अक्षय कुमार : मुंबई पुलिस पासपोर्ट पर रिलीजन देखकर गोली नहीं चलाती, क्रिमिनल रिकॉर्ड देखकर ठोकती है। 
2. जॅकी श्रॉफ : हिंदुस्तान ने मेरी किस्मत बदली, अब मैं हिंदुस्तान की किस्मत पलट दूंगा।
3. जावेद जाफरी: सूर्या वो लोग कब आएंगे ये मैं नहीं जानता, लेकिन आएंगे जरूर।
अक्षय कुमार : इस बार आएंगे तो देख लेंगे सालों को।
4. अक्षय कुमार : जिस गोली से तू मरेगा, उस पर ऐसे बड़े अक्षरों में लिखा होगा...मेड इन इंडिया।
5. अक्षय कुमार : आप जानते हैं कि ये कौन हैं? नईम खान...तीस साल ईमानदारी से पुलिस की ड्यूटी की है इन्होने... और अब इनका बेटा अब्बास हमारे एंटी टेररिज्म स्क्वॉड का एक होनहार ऑफिसर है...ये हैं हिंदुस्तान के मुसलमान। 


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शनिवारी चित्रपटाचे ट्रेलर पाहिले होते. यानंतर उत्साहित होऊन त्यांनी याविषयी दोन ट्विट्स केले आणि आपली प्रतिक्रियादेखील व्यक्त केली होती. याविषयी तरणने लिहिले, 'सूर्यवंशीचे ट्रेलर पाहिले. खूपच दमदार आहे. रोहित शेट्टी खरोखरच मनोरंजनाचा सम्राट आहे. अक्षयला अॅक्शन मोडमध्ये पाहून चांगले वाटले. बॉक्स ऑफिसवर सुनामीसाठी तयार राहा. हा चित्रपट हिट होऊ शकतो. याचे ट्रेलर 4 मिनिटांचे आहे. ते 2 मार्च राेजी रिलीज होईल. यात सिंबा, सिंघम आणि सूर्यवंशी तिघेही दिसतील.'

बातम्या आणखी आहेत...