आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Starrer Movie Prithviraj Chauhan Will Be Shot On More Than 35 Different Sets Of India

भारतातील 35 पेक्षा जास्त सेट्सवर शूट होईल 'पृथ्वीराज'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः यशराज फिल्म्स इतिहासावर आधारित सर्वात मोठ्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निर्माते याला भव्य बनवण्यामध्ये कोणतीच कमतरता ठेवू इच्छित नाहीत. इतिहासावर आधारित या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 35 भव्य सेट्सची निर्मिती करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी कोणत्याही बॉलीवूड चित्रपटासाठी एवढ्या जास्त सेट्सची निर्मिती करण्यात आलेली नसल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

  • महाराष्ट्र-राजस्थानात होणार शूटिंग

निर्मितीशी संबंधित सूत्राने सांगितले की, 'चंदबरदाई यांनी लिहिलेले महाकाव्य 'पृथ्वीराज रासो'वर आधारित आहे. याची बहुतांश शूटिंग महाराष्ट्र आणि राजस्थानातील काही भागांमध्ये होणार आहे. चित्रपट अधिक चांगला बनवण्यासाठी निर्माते वेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत. यात त्या काळातील राजे, राज्यांची भव्यता दाखवली जाईल.

  • पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार चित्रपट

चाणक्य ही मालिका आणि पिंजर हा चित्रपट दिग्दर्शित करणारे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.