आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Did U Know: 100हून अधिक फिल्म्स करणा-या अक्षयचे हे 9 चित्रपट कधीच रिलीज झाले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 27 वर्षांपूर्वी 'सौगंध' (1991) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेता अक्षय कुमारची गणना बॉलिवूडच्या मोस्ट एंटरटेनिंग स्टार्समध्ये होते. त्याने फिल्मी करिअरमध्ये आजवर अनेक अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. वर्षाला त्याचे तीन ते चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आजवर सुमारे 117 चित्रपटांमध्ये झळकलेल्या अक्षयचे काही चित्रपट असेही आहेत, जे आजवर कधीच रिलीज झाले नाहीत. या 

पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अक्षयच्या अद्याप रिलीज न झालेल्या 9 चित्रपटांविषयी सांगत आहोत. अक्षयच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'गोल्ड' या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत 55 कोटींची कमाई केली आहे. 

 

1. परिणाम
अक्षयने हा चित्रपट 1993 मध्ये साइन केला होता. या चित्रपटात त्याच्या अपोझिट दिव्या भारती होती. पण शूटिंग सुरु होण्यापूर्वीच 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारतीचे निधन झाले होते. त्यामुळे हा चित्रपट कधी बनलाच नाही. 

 

2. जिगरबाज
1997 मध्ये बनलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत जॅकी श्रॉफ, मनीषा कोइराला, अमरीश पुरी, ममता कुलकर्णी आणि बिंदु होते. हा चित्रपट अशा एका तरुणाची कथा होती, ज्याला तो अनौरस असल्याचे आणि वडिलांनी त्याच्या आईवर केलेल्या अत्याचाराविषयी समजतं. तो तरुण याचा सूड घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान तो त्याच्याच सावत्र बहिणीच्या प्रेमात पडतो. अक्षयचा हा चित्रपट आजवर रिलीज झाला नाही.  

 

 

3. पूरब की लैला पश्चिम का छैला
1997 मध्ये अक्षय कुमारने 'पूरब की लैला पश्चिम का छैला' हा चित्रपट साइन केला होता. अक्षयसह यामध्ये सुनील शेट्टी आणि नम्रता शिरोडकर होते. चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरणही झाले होते. पण नंतर मात्र चित्रीकरण रखडले. काही वर्षांनी जेव्हा अक्षयने हा चित्रपट पूर्ण करण्याचा विचार केला तेव्हा नम्रता शिरोडकरने साऊथ अॅक्टर महेश बाबूसोबत लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. त्यामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 

 

4. मुलाकात
हा चित्रपट अक्षयने 1999 मध्ये साइन केला होता. शूटिंगच्या काही दिवसांनी चित्रपट डबाबंद झाला. मुकेश भट या चित्रपटाचे निर्माते होते. अक्षयसह राणी मुखर्जी आणि चंद्रचूड सिंह या चित्रपटात होते. पण नंतर हाही चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 

 

5. खिलाडी vs खिलाडी
2001 साली अक्षयने खिलाडी सीरीजचा आणखी एक चित्रपट साइन केला होता. 'खिलाडी vs खिलाडी' हे चित्रपटाचे नाव होते. उमेश राय याचे दिग्दर्शक होते. पण चित्रपट पुढे सरकू शकला नाही. 

 

6. राहगीर

अक्षयचा हा चित्रपट देव आनंद यांच्या गाजलेल्या 'गाइड' या चित्रपटाचा रिमेक होता. रितुपर्णो घोष हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. अक्षय कुमारसोबत विद्या बालन यामध्ये लीड रोलमध्ये होती. चित्रपटाची घोषणा झाली, पण प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही. नंतर बातम्या आल्या होत्या की, गाइडचा रिमेक होऊ नये, असे देव आनंद यांचे मत होते. शिवाय रिमेकसाठी निर्मात्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. 

 

7. सामना
2006 मध्ये दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटासाठी अक्षयसह अजय देवगण, नाना पाटेकर, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, महिमा चौधरी यांना साइन केले होते. पण चित्रपटावरुन वाद निर्माण झाल्याने संतोषी यांनी हा प्रोजेक्ट बंद केला होता. 

 

8. आसमान

हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय 'ब्लू' या चित्रपटाचा सिक्वेल होता. चित्रपटात ब्लूमधील कलाकार म्हणजेच लारा दत्ता, संजय दत्त, कतरिना कैफ आणि जाएद खान यांच्याव्यतिरिक्त जॉन अब्राहम, नेहा ओबेरॉय आणि सोनल चौहान यांना घेण्यात आले होते. चित्रपटाची घोषणा झाली खरी, पण चित्रीकरणाला सुरुवातच झाली नाही. 

 

9. चांद भाई

 2012 मध्ये अक्षयने हा चित्रपट साइन केला होता. या चित्रपटाची कहाणी अशा एका तरुणाची होती, जो गँगस्टर बनू इच्छितो. निखिल आडवाणी चित्रपट दिग्दर्शित करणार होते. अक्षयसह विद्या बालनला यासाठी साइन करण्यात आले होते. दुर्दैवाने हा चित्रपटही डबाबंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...