आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यूझिक व्हिडिओ 'फिलहाल' मध्ये दिसणार आहे अक्षय कुमार, कृती सेननची बहीण नुपुरसोबत केले गाण्याचे शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आपले चित्रपट आणि शाेद्वारे फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता अक्षय कुमार आता म्यूझिक व्हिडिओमध्येही दिसणार आहे. सोशल मीडियावर अक्षयचा हा म्यूझिक व्हिडिओ 'फिलहाल' च्या शूटिंगचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अक्षय व्हिडिओच्या संपूर्ण टीमसोबत दिसत आहे. 

मुंबईच्या कॉलेजमध्ये झाले शूटिंग... 
नुपुर-अक्षयचे हे रोमँटिक गाणे जानी याने लिहिले आहे, या गाण्याचा सिंगर अक्षयचा चित्रपट 'केसरी' मध्ये 'तेरी मिट्टी' या गाण्याला आपला आवाज दिलेल्या बी प्राक हा आहे. याव्यतिरिक्त फेमस पंजाबी सिंगर एम्मी विर्कदेखील व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. गाण्याचे शूटिंग मुंबईच्या सेंट जेव्हियर कॉलेजमध्ये झाले.  व्हिडिओचे दिग्दर्शन अरविंद खैराने केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...