आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar To Start Preparations For Upcoming Movie 'Prithviraj Chauhan' Shooting Starting From March 2020

'पृथ्वीराज चौहान'साठी अक्षयने सुरू केली तयारी, पुढील वर्षी सुरू होईल चित्रपटाची शूटींग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज चौहान' चे शूटिंग मार्च 2020 मध्ये सुरु होणार आहे मात्र तो आतापासून चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. रोलच्या तयारीसाठी अक्षयला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या पात्रासाठी त्याला तलवार आणि धनुष्यबाण चालवणे शिवावे लागणार आहे.
 

या गोष्टींवर काम करेल अक्षय
 

> चालणे-बोलणे
चित्रपटासाठी सर्वात आधी अक्षयला पृथ्वीराज चौहान यांचे चालणे बोलणे कॉपी करावे लागणार आहे. अक्षयची उंची भलेही पृथ्वीराज यांच्यापेक्षा थोडी जास्त आहे पण बाकीच्या गोष्टींमध्ये अक्षयला जीव तोडून मेहनत करावी लागेल.  
 

 अक्षयला वाढवावे लागेल वज
पृथ्वीराज चव्हाण यांची उंची सुमारे 5 फुट 8 इंच होती आणि अक्षय 6 फुट उंच आहे. त्यांच्या भूमिकेसाठी उंची तेवढी महत्वाची नसेल, जेवढे त्यांची शरीरयष्टी आहे. जिममध्ये त्याला चेस्ट आणि बायसेप्सवर खूप काम करावे लागेल.
 

> शस्त्रकला
अक्षयसाठी दुसरी सर्वात मोठी तयारी असेल की, धनुष्यबाण आणि तलवार शिकणे. तलवारबाजी तर त्याने आपला काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'केसरी साठी शिकली होती. पण आता त्याला पृथ्वीराज चौहानसाठी यांच्यापेक्षाही वेगळी शैली शिकणार आहे.  
 

रोलसाठी त्याला इतर गोष्टींचेही ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे.  
पृथ्वीराज खूप चांगले धनुष्य चालवायचे आणि ते कुणाचा आवाज ऐकूनही वाचून निशाना लावत होते.  
पृथ्वीराज 38 इंचाच्या तलवारीने लढायचे आणि त्यामुळे अक्षयदेखील एवढ्याच मोठ्या तलवारीने ट्रेनिंग घेणार आहे 
 

> मेकअप
या भूमिकेसाठी अक्षयला लांब केस आणि लांब मिशा ठेवाव्या लागणार आहेत. या दोन्हींसाठी तो खोट्या केसांचाही वापर करू शकतो, पण चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या प्रोस्थेटिक्सचा वापर केला जाणार नाही. याव्यतिरिक्त अक्षय कानात मोठ्या मोठ्या बाळ्याही घालणार आहे.  
 

> प्लॉट
या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांचा सामना मोहम्मद गौरीसोबत झालेला दाखवणार आहे. इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती की, या रोलमध्ये संजय दत्त दिसू शकतो, मात्र आता सूत्रांकडून कळते आहे की, ही भूमिका मानव विज साकारणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढीलवर्षी उत्तर भारतातील खऱ्या लोकेशंसवर सुरू होईल. 

बातम्या आणखी आहेत...