आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार बनला मुंबईचा ट्रॉफिक पोलिस; लोकांना म्‍हणतोय, हा रस्‍ता कोणाच्‍या बापाचा नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अक्षय कुमारचे 3 व्हिडिओ सध्‍या सोशल मिडियावर व्‍हायरल होत आहे. यामध्‍ये अक्षय ट्रॉफिक पोलिसांच्‍या भुमिकेत दिसत असून वाहतूकीचे नियम मोडणा-यांना खडसावताना दिसत आहे. यावेळी तो लोकांना म्‍हणतो, 'हा रस्‍ता कोणाच्‍या बापाचा नाही.' 15 ऑगस्‍टरोजी अक्षयचा 'गोल्‍ड' सिनेमा रिलीज होत आहे. त्‍यासाठी हा अक्षयचा पब्लिसिटी स्‍टंट असल्‍याचे काही जणांचे म्‍हणणे आहे.

 

काय आहे या व्हिडिओंमध्‍ये?
हे व्हिडिओ अक्षयने आपल्‍या ट्विटरपेजवर शेअर केले आहेत. यामध्‍ये तो विना हेल्‍मेट बाईक चालवणा-या, बाईकवर ट्रि‍पल सिट जाणा-या तरूणांना तसेच रॉंग साईडने कार चालवणा-या व सीटबेल्‍ट न बांधणा-या चारचाकी वाहन चालकांना आपल्‍या शैलीत खडसावताना दिसत आहे.

 

रस्‍ता सुरक्षा अभियानाशी जोडलेला आहे अक्षय
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार रस्‍ता वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्‍या (MORTH) रस्‍ता सुरक्षा अभियानाशी जोडला गेलेला आहे. मंत्रालयाने रस्‍ता वाहतूकीच्‍या जागरूकतेसाठी काही व्हिडिओ तयार केले आहेत. यामध्‍येच अक्षय कुमार ट्रॉफिक पोलिसांच्‍या भुमिकेत दिसत आहे. या अभियानाचा लोगो आहे 'सडक सुरक्षा जीवन रक्षा'.   केंद्रिय रस्‍ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी 13 ऑगस्‍टरोजी अक्षय कुमारच्‍या उपस्थित हे अभियान लॉंच केले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, इतर दोन व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...