• Home
  • Gossip
  • Akshay Kumar tweeted and praised women scientists in mission 'Chandrayan 2'

Bollywood / अक्षय कुमारने ट्वीट करून केले 'चंद्रयान-2' चे नेतृत्व करणाऱ्या महिला वैज्ञानिकांचे कौतुक 

पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे 'मिशन मंगल'

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 05:04:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : इसरोद्वारा 15 जुलैला 'चंद्रयान -2' ला श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉन्च केले जाणार आहे. या यशापूर्वी 'मिशन मंगल' चित्रपटात साइंटिस्ट चा रोल करणाऱ्या अक्षय कुमारने मिशन चंद्रयान-2 मध्ये सामील असलेल्या सर्व महिला वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षयने लिहिला खास मॅसेज...
अक्षयने ट्विटरवर मॅसेज पोस्ट केला आहे, "चंद्रमावर भारताचे दुसरे अंतराळ अभियान, 'चंद्रयान-2' चे नेतृत्व इसरोच्या दोन महिला वैज्ञानिकांद्वारे गेले आहे, जे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे. रॉकेट वुमन आणि इसरोच्या टीमला हार्दिक शुभेच्छा."

बाहुबली आहे मिशनचे उपनाम...
चंद्रयान - 2 भारताचे दुसरे सर्वात महत्वाकांक्षी चंद्र मिशन आहे. हे 15 जुलैला 2.51 AM वर लॉन्च केले जाईल. 'बाहुबली' चे उपनाम हे यान जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल - मार्क III म्हणजेच (GSLV Mk III) ने पाठवले जाईल.

पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे 'मिशन मंगल'...
भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशनवर बनलेला चित्रपट 'मिशन मंगल' 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी आणि शरमन जोशी यांसारखे कलाकार आहेत.

X
COMMENT