आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Wants To Raise Awareness On The Growing Problem Of Depression In India, Will Now Make Movie Based On Depression

भारतात डिप्रेशनच्या वाढत्या समस्येवर जनजागृती करू इच्छितो अक्षय कुमार, आता बनवणार नैराश्यावर आधारित चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : नुकतेच टीव्ही आणि सिने अभिनेता कुशल पंजाबीने नैराश्यामुळे आत्महत्या केली होती. या बातमीमुळे बॉलीवूड कलाकारदेखील दु:खी झाले आहेत. आता बातमी आहे की, अक्षय कुमार नैराश्यावर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे.

एका मुलाखतीत अक्षय म्हणाला...

सध्या भारतात डिप्रेशनची समस्या वाढत चालली आहे. मी या विषयावर चित्रपट बनवून लोकांना जागरूक करणार आहे. मी कुशलसोबत दोन चित्रपटात काम केले होते. सर्वांच्या आपापल्या अडचणी असतात. टोकाचे पाऊल उचलण्यामागे काही तरी मोठे कारण असेलच. मात्र मी एवढेच सांगेन की, मित्रांनो तुम्ही धाडसी व्हा, अडचणीचा सामना करा.

2019 मध्ये कमाईचा बादशाह बनला अक्षय

गेल्या वर्षी अक्षयने एका पाठोपाठ एक असे टॉप चित्रपट दिले ते सर्वच सुपरहिट ठरले. तो २०१९ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'गुड न्यूज'ने आतापर्यंत 117.10 कोटी रुपये कमवले आहेत.