आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Was Taking The Girl For A Morning Walk, Went To A Aged Couples Home And Eat Sweet Chapati

अभिनेता अक्षयकुमारने अनुभवला पवना धरण परिसरातील झोपडीतला पाहुणचार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर मॉर्निंग वॉकचा एक किस्सा शेअर केला आहे. अक्षयने दोन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये त्याच्यासोबत मुलगी नितारादेखील दिसत आहे. अक्षय एका झोपडीमध्ये दिसत आहे, जिथे तो पाणी शोधत शोधत गेला होता.  
 

   

अक्षय म्हणाला मुलीला मिळाली आयुष्याची शिकवण... 
 
पोस्टमध्ये त्याने लिहिले, "आजचा मॉर्निंग वॉक छोट्या निताराच्या आयुष्यातील एक शिकवण बनला आहे. आम्ही या दयाळू आणि वयस्कर दांपत्याच्या घरी पाणी शोधत आलो होतो, पण त्यांनी आमच्यासाठी खूपच स्वादिष्ट गूळ चपाती बनवली होती. खरच दयाळू होण्यासाठी काहीही खर्च लागत नाही, पण यामुळे मिळते खूप काही."
 
 
 

सुट्ट्या एन्जॉय करत आहे अक्षयची फॅमिली... 
 
अक्षय सध्या आपल्या कुटुंबियांसोबत महाराष्ट्रातील शिलिम गावामध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. जिथे त्याने आजेसासुचा 80 वा वाढदिवशी साजरा केला. अशातच अक्षयचा चित्रपट 'हाउसफुल 4' रिलीज झाला आहे. ज्याने 109 कोटींची कमाई केली आहे.  

बातम्या आणखी आहेत...