आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar's Fan Walked 900 Kms From Dwarka To Mumbai To Meet His Favorite Superstar

अक्षय कुमारला भेटायला 900 किमी पायी चालत आला चाहता, 18 दिवसांत पूर्ण केला द्वारका ते मुंबईपर्यंतचा प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - अक्षय कुमारने रविवारी सोशल मीडियावर आपल्या एका चाहत्याचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. अक्षयचा हा चाहता त्याला भेटण्यासाठी 18 दिवसांत द्वारका ते मुंबईपर्यंत 900 किमी चालत आला. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले की, 'आज सकाळी प्रभातला मी भेटलो. तो थेट 18 दिवसांत द्वारकेहून मला भेटण्यासाठी मुंबईला आला आहे. आजच्या तरुणांनी आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी या प्रकारचे नियोजन आणि दृढनिश्चय केला तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही.' 
 
या व्यतिरिक्त अक्षयने आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिले की, अशा प्रकारचे प्रेम पाहून मी खुश होतो. मात्र मी चाहत्यांना विनंती करतो की, अशा प्रकारच्या गोष्टी करू नये. आपला वेळ आणि ऊर्जा आपल्या जीवनाला चांगले बनवण्यासाठी खर्च करावा. 
 

            व्हिडियोमध्ये प्रभात, अक्षयला म्हणतो..., मी तुझा खूप मोठा चाहता आहे आणि फिट आहे, लोकांना हे कळावे यासाठी मी पायी चालत आलो.   

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 
https://www.instagram.com/tv/B13DpzInb32/?utm_source=ig_web_copy_link

बातम्या आणखी आहेत...