आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारला पाहून क्रेझी झाले दिल्लीवाले, कारच्या छतावर बसून अभिनेत्याने घेतला फॅन्ससोबत सेल्फी, व्हायरल होत आहे Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमार सध्या आपली आगामी फिल्म 'केसरी' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. फिल्मचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय दिल्लीला पोहोचला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी रस्त्यावर उसळली. अक्षयला पाहून फॅन्स अक्षयच्या नावाने घोषणा देऊ लागले. फॅन्सला क्रेझी झालेले पाहून अक्षयदेखील आपल्या कारच्या छतावर बसला. त्याने फॅन्ससोबत सेल्फीही घेतला. एवढेच नाही तर यावेळी ड्यूटीवर असलेले पोलिसही क्रेझी झालेले दिसले. त्यांनीही अक्षयचे खूप फोटोज क्लिक केले. काहींनी तर त्याच्यासोबत सेल्फीदेखील काढला. अक्षयने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवरही शेयर केला आहे. त्याने व्हिडीओ शेयर करून लिहिले आहे. 'No matter how many times in a year I come here, Delhi is always ready with a warm welcome ❤️ A big thank you from Team #Kesari 🙏🏻'.

- अक्षयची फिल्म 'केसरी' 21 मार्चला रिलीज होत आहे. फिल्ममध्ये त्याच्यासोबत परिणीति चोप्रा लीड रोलमध्ये आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या फिल्मचे डायरेक्टर अनुराग सिंह आहेत. 'केसरी' सारागडीच्या लढाईवर आधारित आहे. यामध्ये 21 शिख 10,000 अफगाण्यांशी लढले होते. 

बातम्या आणखी आहेत...