आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये अक्षय कुमारच्या 'केसरी' ने रणवीर सिंह आणि अजय देवगनच्या चित्रपटांनाही टाकले मागे, जबरदस्त ओपनिंगसोबत फिल्मने केली कोटींची कमाई 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमारच्या 'केसरी' ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. फिल्मने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली. ट्रेड एनालिस्ट रमेश बालाने आपल्या ट्वीटरवर 'केसरी' च्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट केले आहे, 'अक्षय कुमारच्या 'केसरी' ला 2019 च्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वात जोरदार ओपनिंग मिळाले आहे. फिल्मने पहिल्याच दिवशी 22 कोटी रुपये कमावले. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार, फिल्मने 21.50 कोटींची कमाई केली आहे. त्यांनी ही माहिती ट्वीट करून दिली आहे.  

क्रिटिक्सकडून मिळाला चांगला रिस्पॉन्स...
- अक्षयच्या फिल्मला क्रिटिक्सचाही चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. डायरेक्टर अनुराग सिंहची ही फिल्म 18व्या शताब्दीच्या ऐतिहासिक युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये 21 सिख जवानांनी 10 हजारपेक्षा जास्त अफगानी सैनिकांना सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले होते आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी कित्तेक तास त्यांच्याशी ते लढत होते. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेल्या या फिल्ममध्ये अक्षयसोबत परिणीति चोप्राने काम केले आहे. 

#Kesari roars... Sets the BO on 🔥🔥🔥... Emerges the biggest opener of 2019 [so far]... After limited shows in morning/noon [#Holi festivities], the biz witnessed massive growth from 3 pm/4 pm onwards... Evening shows saw terrific occupancy... Thu ₹ 21.50 cr. India biz.

— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2019

Top *Opening Day* biz - 2019...
1. #Kesari ₹ 21.50 cr [Thu]
2. #GullyBoy ₹ 19.40 cr [Thu]
3. #TotalDhamaal ₹ 16.50 cr
4. #CaptainMarvel ₹ 13.01 cr
Note: ₹ 10 cr+ openers.
India biz.#Kesari is Akshay Kumar’s second biggest opener, after #Gold [₹ 25.25 cr; #IndependenceDay].

— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2019

2019 ची सर्वात मोठी ओपनिंग बनली अक्षयची 'केसरी'...  
- 2019 मध्ये रिलीज झालेल्या इतर चित्रपटांच्या तुलनेत अक्षयच्या केसरीने शानदार कमाई केली आहे. याचवर्षी आलेल्या कंगना रनोटची फिल्म 'मणिकर्णिका' ने पहिल्या दिवशी 8.75 कोटींची कमाई केली होती. तर रणवीर सिंहच्या 'गली बॉय' ने 19.40 कोटी रुपये, अजय देवगन-अनिल कपूर यांच्या फिल्म 'टोटल धमाल' ने 16.50 कोटी रुपये कमवले. तर अमिताभ बच्चन यांच्या फिल्म 'बदला' ने 5.94 कोटींची कमाई केली होती. तसेच सर्जिकल स्ट्राइकवर आधारित फिल्म 'उरी' ने पहिल्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमवले होते. अनुपम खेर यांची फिल्म 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' पहिल्या दिवशी 3.50 कोटी रुपयेच कमावू शकली होती. सोनम कपूरची फिल्म 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' ने पहिल्या दिवशी 3.30 कोटी रुपये कमवले होते. 

. @akshaykumar 's #Kesari takes the biggest opening for a Bollywood movie in 2019..

₹ 22 Cr Nett for Day 1.. Early Estimates..

— Ramesh Bala (@rameshlaus) March 22, 2019

रिलीजनंतर काही तासातच फिल्म झाली लीक... 
फिल्म 'केसरी'बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे, फिल्म रिलीजनंतर काही तासातच ऑनलाइन लीक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, फिल्म तामिळ रॉकर्सवर लीक झाली आहे. तामिळ रॉकर्स एक पायरसी वेबसाइट आहे जी ऑनलाइन पायरेटेड कॉपी लीक करते. या वेबसाइटद्वारे आत्तापर्यंत अनेक फिल्म ऑनलाइन लीक झाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...