आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unknown Facts : वेटर ते बॉलिवूडचा सुपरस्टार, जाणून घ्या खिलाडी अक्षय कुमाविषयी A to Z

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या 'गोल्ड' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आहे. अक्षयचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर हा चित्रपट भाष्य करतो. स्वतंत्र भारतासाठी हॉकी या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न तपन दासचं असतं आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी तो खेळाडूंना कशाप्रकारे एकत्र आणतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तपन दासची भूमिका अक्षयने या चित्रपटात वठवली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली लंडनमध्ये झालेल्या 14व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. अक्षय कुमारसोबतच चित्रपटामध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात अक्षय बंगाली लूकमध्ये दिसतोय. 

 

गेल्या 27 वर्षांपासून अक्षयने सिल्व्हन स्क्रिनवरची आपली जादू कायम ठेवली आहे. कॉमेडी असो वा देशभक्ती, अक्षयने प्रत्येक चित्रपटात स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. एकीकडे तो 'बेबी' आणि 'हॉलिडे' यांसारख्या देशभक्तीवर आधारित चित्रपटांमध्ये दिसतो, तर दुसरीकडे 'सिंह इज ब्लिंग' आणि 'ब्रदर्स' या मसालापटांमध्येही तो तीच कमाल दाखवतो. अक्षयने इंडस्ट्रीत आज जे स्थान पटकावले  आहे, तिथवर पोहोचायला त्याला बराच संघर्ष आणि मेहनत करावी लागली आहे. दिल्लीच्या चांदनी चौकच्या गल्लीपासून ते बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपर्यंतचा त्याचा हा प्रवास खूप रंजक आहे.


जाणून घेऊयात, अक्षयविषयीच्या A to Z गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...