आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay Kumar's Good News To Release In Hong Kong On 13 February

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात धमाल केल्यानंतर आता हाँगकाँगमध्ये रिलीज होईल ‘गुड न्यूज’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि किआरा अडवाणी स्टारर ‘गुड न्यूज’ चित्रपटाने भारतात धमाल केल्यानंतर आता हाँगकाँगमध्ये रिलीजसाठी सज्ज हाेणार आहे. शनिवारी एक पोस्टर रिलीज करून त्याने याची माहिती दिली. त्याने लिहिले...,हाँगकाँगमध्ये रिलीज करण्यासाठी चित्रपट सज्ज आहे. 

१३ फेब्रुवारी रोजी चित्रपट तेथे रिलीज होणार आहे. करण जोहरच्या धर्माा प्रॉडक्शन आणि अक्षय कुमारच्या केप ऑफ गॉड फिल्म्सच्या बॅनर खाली हा चित्रपट भारतात २७ डिसेंबर २०१९ रोजी रिलीज झाला होता. ९५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ २०४.६२ काेटींचा व्यवासाय केला होता. जागतिक स्तरावर एकूण व्यवसाय ३०० कोटीचा आहे.