आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा शेफ राजीव भाटिया होणार बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार, हे आहे यामागचे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अक्षय कुमार चित्रपटात येण्यापूर्वी शेफ आणि वेटरचे काम करत होता, हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. तेव्हा तो राजीव भाटिया नाव लावत होता. आता बॉलिवूड वर्तुळात चर्चा आहे की, अक्षयला खाद्यपदर्थावर आधारित एका चित्रपटाची आॅफर आली आहे. यात निर्माते त्याचे आधीचे जीवन दाखवू इच्छित आहेत. निर्माते अक्षयला राजीव भाटीया म्हणून सादर करू पाहत आहेत. त्यांच्या जवळच्या सूत्रानी सांगितले, अक्षयला ज्या खाद्य पदार्थावर आधारित चित्रपटाचा प्रस्ताव आला तो लखनवी स्वादिष्ट पदार्थांवर आधारित आहे. विशेष करून तेथील टुंडे कबाब, बिरयानी पासून ते विविध पदार्थावर आधारित आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अक्षयने पक्का विचार केला आहे. तो लवकरच याविषयी घोषणा करू शकतो. अक्षयला कुकिंगचा अनुभव आहे, त्यामुळे तो यासाठी योग्य असल्याचे निर्मात्याचे म्हणणे आहे. अक्षयच पहिली पसंत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 


अक्षयच का? 
या चित्रपटातून अक्षयच्या आधीच्या जीवनाविषयी कळू शकेल. जेव्हा ता शेफ होता. या चित्रपटातून तो आपले अनुभवही सांगणार आहे. त्याकाळातील संघर्ष आपल्या चाहत्यांना कळावा अशी त्याची इच्छा आहे. पडद्यावर त्याचा संघर्ष दाखवला त्याच्या चाहत्यांना आवडेल अशी निर्मात्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच अक्षय कुमारला या चित्रपटात घेण्याचा प्रयत्न निर्माते करत आहेत. अक्षय कुमारने या आधी काही चित्रपटात आपली भूमिका साकारली. 

 

आधीदेखील बनले आहेत असे चित्रपट...  
- फूड जॉनरमध्ये सर्वात चर्चित चित्रपट राजेश खन्ना यांचा 'बावर्ची' होता. 

- सैफ अली खानने खाद्यावर आधारित 'सलाम नमस्ते' आणि 'शेफ' केले. 
- 'द लंचबॉक्स' तर याच धाटणीवर होता. पुरुषाच्या मनाचा रस्ता पोटाद्वारे जातो. 
- 'चीनी कम' मध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन शेफ बनले होते. 
- 'लव शव ते चिकन खुराना' आणि 'रामजी लंदन वाले' खाद्यावर आधारित होता.
- 'इंग्लिश विंग्लिश' मध्ये श्रीदेवी आपले फूड स्टार्टअप सुरू करते. 
- 'स्टेनली का डिब्बा'ची कथादेखील खाद्य पदार्थावरच होती. 

 

पडद्यावर स्वत:चे पात्र साकारणारे कलाकार 
आधीदेखील अनेक कलाकारांनी आपली भूमिका पडद्यावर साकारली आहे. यावर एक नजर 

कलाकार      चित्रपट 
सलमान खान      अजब प्रेम की गजब कहानी 
अमिताभ बच्चन      बॉम्बे टॉकिज, की एंड का 
कतरिना कैफ      बॉम्बे टॉकिज 
रणबीर कपूर      भूतनाथ रिटर्न 
जूही चावला      अंदाज अपना-अपना
गोविंदा      अंदाज अपना-अपना
धर्मेंद्र      गुड्‌डी 
सुनील शेट्‌टी      वेलकम 
प्रियांका चोप्रा      जाने कहां से आई है

बातम्या आणखी आहेत...