आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारला फोर्ब्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कलाकारांच्या लिस्टमध्ये 33 वे स्थान दिले आहे. तो या लिस्टमध्ये जागा मिळवणारा एकमेव भारतीय आहे. त्याची कमाई 6.5 कोटी डॉलर (444 कोटी रुपये) आहे. मागच्या एका वर्षांमध्ये त्याने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपयांपासून 68 कोटी रुपये घेतले. 2018 च्या लिस्टमध्ये अक्षय 270 कोटी रुपयांच्या कमाईसोबत 76 व्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या या यशावर तापसीने त्याला शुभेच्छा दिल्या.
तापसीने दिल्या फनी शुभेच्छा तर अक्षयनेदेखील दिले उत्तर...
तापसीने अक्षयला शुभेच्छा देत ट्विटरवर लिहिले, 'इंस्पायरिंग, योग्य आणि आमच्या आसपास सर्वात उत्तम व्यक्ती, अक्षय कुमार, बस सर आता शेअरिंग आणि केअरिंगची वेळ आहे. तापसीने अशी फिरकी घेल्यामुळे अक्षयने एक फनी मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये तो विचित्र तोंड बनवतांना दिसत आहे. हे शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले, 'माफ करा.' अक्षय आणि तापसीने आधी 'बेबी' आणि 'नाम शबाना' मध्ये एकत्र काम केले आहे. आता दोघे 'मिशन मंगल' मध्ये एकत्र दिसणार आहेत.
15 ऑगस्टला रिलीज होणार आहे चित्रपट...
'मिशन मंगल' मध्ये अक्षय कुमार आणि तापसी पन्नूव्यतिरिक्त विद्या बालन, कीर्ति कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन,शरमन जोशी हेदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट मिशन मंगळच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. ज्यामध्ये भारताच्या स्पेस मिशनची खरी कहाणी दाखवली जाणार आहे. चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.