आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' केवळ 2 दिवसांत बनवले हे 6 मोठे रेकॉर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अक्षय कुमार आणि मौनी रॉय स्टारर 'गोल्ड' हा चित्रपट बॉक्सऑफिस उत्तम कामगिरी करत आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने 33.25 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्टनुसार 5 दिवसांच्या मोठ्या विकएंडमुळे हा चित्रपट अनेक रेकॉर्ड बनवू शकतो. तसं पाहता दोन दिवसांतच या चित्रपटाने सहा रेकॉर्ड कायम केले आहेत.

 

1. अक्षय कुमारचा सर्वात मोठा ओपनर...

‘गोल्ड’ने पहिल्या दिवशी 25.25 कोटींची कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या आजवरच्या कुठल्याही चित्रपटाने पहिल्या दिवशी एवढे कलेक्शन केलेले नाही. आता ‘गोल्ड’ अक्षय कुमारचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.

 

2. स्वातंत्र्यदिनी रिलीज झालेला अक्षयचा सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट...

अक्षय कुमारने सलग चौथ्यांदा 15 ऑगस्टच्या दिवशी आपला चित्रपट रिलीज केला आहे. ‘ब्रदर्स’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘रुस्तम’नंतर ‘गोल्ड’ अक्षय कुमारचा स्वातंत्र्यदिनी रिलीज झालेला चौथा चित्रपट आहे. ‘गोल्ड’ने जेवढी कमाई केली तेवढी कमाई त्याच्या याआधीच्या 15 ऑगस्टच्या दिवशी रिलीज झालेल्या चित्रपटांनी केलेली नाही.

 

3. 2018 या वर्षातील तिसरा सर्वाधिक फर्स्ट डे ग्रॉसर
पहिल्या दिवशी बक्कळ कमाई करत ‘गोल्ड’ हा चित्रपट 2018 मधील तिसरा सर्वाच मोठा  फर्स्ट डे ग्रॉसर चित्रपट ठरला आहे. या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘संजू’ आणि दुस-या क्रमांकावर ‘रेस 3’ असून या दोन्ही चित्रपटांची कमाई ‘गोल्ड’हून अधिक आहे.

 

4. अक्षय कुमारचा सलग आठवा हिट चित्रपट
अक्षय कुमारचे मागील सात चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. त्याच्या या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा क्रम आता ‘गोल्ड’ने कायम ठेवला आहे आणि अक्षयने सलग आठ हिट चित्रपटांचा किताब आपल्या नावी केला आहे. 

 

5. 2018 मधील तिसरा सर्वोत्तम ऑक्यूपेंसी रेट
अक्षय कुमारचा‘गोल्ड’ हा चित्रपट ‘संजू’ आणि ‘रेस 3’ नंतर तिसरा असा चित्रपट आहे, ज्याचा ऑक्यूपेंसी रेट 70 टक्क्यांजवळ आहे. यावर्षी रिलीज झालेले फार क्वचितच चित्रपट बघायला प्रेक्षक एवढ्या संख्येने चित्रपटगृहांमध्ये गेले आहेत.

 

6. मौनी रॉयचा बिग ओपनर चित्रपट 

‘गोल्ड’ या चित्रपटाद्वारे मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्या डेब्यू चित्रपटाने अनेक रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी 

25.25 कोटींची कमाई करुन ‘गोल्ड’ आता मौनी रॉयच्या करिअरमधील बिग ओपनर चित्रपट ठरला आह

बातम्या आणखी आहेत...