आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः 'हाऊसफूल 4' आणि 'मरजावां' या चित्रपटाचा साऊंड टेक्निशिअन निमिश पिळनकरचा कामाच्या अति ताणामुळे मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस तो दिवसरात्र काम पूर्ण करण्यात व्यग्र होता. अतिकामाच्या ताणामुळे त्याची अचानक तब्येत बिघडली आणि मेंदुच्या नसा तुटून ब्रेन हॅमरेजने त्याचा मृत्यू झाला. निमिशचं हाय ब्लड प्रेशर वाढलं होतं. मागच्या काही दिवसांपासून तो एका वेब सीरिजसाठी काम करत होता. कामाचा अतिताण हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे समजते. तो केवळ 29 वर्षांचा होता.
निमिशच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. यामध्ये अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंह आणि विपिन शर्मा या कलाकारांचा समावेश आहे. निमिशच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर ऑस्कर विजेते रसूल पोकुट्टी आणि चित्रपट समीक्षक-पत्रकार खालिद मोहम्मद यांनी ट्वीट करुन टेक्निशिअन्सच्या सद्यपरिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.
खालिद यांनी ट्वीटमध्ये लिहिले, - साऊंड टेक्निशियन निमिश पिळनकरचा वयाच्या 29 व्या वर्षी मृत्यू. हे टेक्निशियनच चित्रपटाचा कणा असतात. मात्र त्यांची पर्वा कुणालाच नसते. सर्व संघटना स्टार्स आणि निर्मात्यांनी आता झोपेतून उठण्याची हीच वेळ आहे.
खलिद यांच्या ट्वीटनंतर रसुल पुकुट्टी यांनी रिट्वीट केले होते. त्यांनी लिहिले होते, धन्यवाद तुम्ही याबद्दल लिहिलं, प्रिय बॉलिवूड... खरं तर आम्हाला आणखी किती तडजोड करव्या लागणार आहेत. याचं उत्तर म्हणजे माझा मित्र हे जग सोडून निघून गेला.
अक्षय कुमारने ट्वीट केले अतिशय कमी वयात साऊंड टेक्निशियन निमिश पिळनकरच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या अतिशय कठीण परिस्थितीत मी मनापासून निमिशच्या कुटुंबियांसोबत आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनेसुद्धा ट्वीट करुन निमिशच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. तिने लिहिले, निमिशच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मी हैरण आहे. तो मरजावां चित्रपटात आमच्यासोबत होता. यंग टॅलेंट फार लवकर निघून गेला. कुटुंबाचे सांत्वन करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.