Home | Gossip | akshay said no to best actor's award, everyone is shocked at that moment

अक्षय कुमारने बेस्ट अॅक्टरची ट्रॉफी घ्यायला दिला होता नकार, चालू इव्हेंटमध्ये म्हणाला होता, मी हा अवॉर्ड घेऊ शकत नाही, हा आमिरसाठी आहे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:46 PM IST

अक्षयची अनांउन्समेंट ऐकून प्रियांका चोप्रापासून ते ऐश्वर्या रायपर्यन्त सगळे झाले चकित..

 • akshay said no to best actor's award, everyone is shocked at that moment

  मुंबई : अक्षय कुमारचा चित्रपट '2.0' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या निगेटिव्ह अभिनयासाठी अक्षयला खूप अवॉर्ड्स मिळण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का..? यापूर्वी अक्षयच्या आयुष्यत एकदा असा एक क्षण आला होता. जेव्हा अक्षयला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला होता पण त्याने तो स्वीकारण्यास नकार दिला होता.

  अक्षय कुमारने आमिर खानला दिला होता तो अवॉर्ड..
  अक्षयब कुमारला 'सिंग इज किंग' या चित्रपटासाठी 2009 साली बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. रेखाने त्यांना अवॉर्ड सोपवला आणि आभार मानण्यासाठी जेव्हा अक्षय माईकजवळ गेला. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून सर्वचजण चकित झाले. अक्षय म्हणाला, 'मी 18 वर्षांपासून हा अवॉर्ड मिळण्याची वाट पाहत होतो. माझ्या आयुष्यात हा क्षण आला आणि मला बेस्ट अॅक्टर म्हणून निवडले गेले. मला स्वप्नात देखील नव्हते वाटले नव्हते असे काही होईल आणि चांदणी चौकच्या एका मुलाला हा अवॉर्ड मिळेल. पण तुम्हा सगळ्यांमुळे मला हा अवॉर्ड मिळाला. पण आज माझ्या हातात माझे स्वप्न असताना मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. काही दिवसांपूर्वी मी 'गजनी' हा चित्रपट बघितला आणि ती मला खूप आवडला. त्यांनतर जेव्हा मी लंडनहून परत आलो तेव्हा मी 'सिंग इज किंग' हा चित्रपट बघितला. मी माझ्या कामाची तुलना केली आणि माझ्या लक्षात आले की या वर्षीचा हा बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड आमिर खानलाच मिळायला हवा.

  अक्षयने केली होती आमिरची भरभरून स्तुती..
  जिथे अक्षयचे बोलणे ऐकून तिथे हजर असलेल्या ट्विकल खन्ना, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय, फराह खान, ऋत्विक रोशन आणि जॉन इब्राहिम यांच्यासोबत सर्वचजण चकित झाले होते. तिथे अक्षय मात्र आमिरचे कौतुक करण्यात दंग होते. अक्षय म्हणाला होता, 'त्या माणसाने जे केले. ते पूर्ण डेडिकेशनने केले. मी या अवॉर्डला त्यांच्यापासून दूर नाही ठेऊ शकत. मला माहित आहे कदाचित हा क्षण पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. पण मी ती वस्तू घेऊ शकत नाही जी माझ्यासाठी नाही. मी माझ्या चाहत्यांना नाराज करु इच्छित नाही. पण मला तुमच्या प्रेमावर आणि सपोर्टवर विश्वास आहे. त्यामुळे एक दिवस पुन्हा माझ्या आयुष्यात हा क्षण नक्की येईल. सगळ्यांचे मनःपूर्वक आभार पण आमिर हा अवॉर्ड तुझ्यासाठी आहे. तूच खऱ्या अर्थाने या अवॉर्डचा मानकरी आहेस. माझी विनंती आहे की तू येऊन हा अवॉर्ड स्वीकारावास." आणि त्यानंतर मागच्या ९ वर्षात अक्षयला एक नॅशनल आणि दोन फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत.

Trending