Bollywood / त्रस्त झालेला अक्षय म्हणाला - 'फोटोग्राफर्समुळे घराबाहेर पडू इच्छित नाही 6 वर्षांची मुलगी नितारा'

मुलगा आरवच्या ट्रोलिंगबद्दलही अक्षय बोलला... 

Sep 09,2019 03:35:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचे म्हणणे आहे की, त्याची 6 वर्षांची मुलगी नितारा फोटोग्राफर्समुळे घराबाहेर पडू इच्छित नाही. 'मिशन मंगल' फेम अभिनेता अक्षय कुमार खूप परेशान आहे. झाले असे की, एका मुलाखतीदरम्यान अक्षयला विचारले गेले होते की, त्यांची मुले तेव्हा कॉस्म्फर्टेबल असतात का जेव्हा त्यांची इच्छा नसतांनाही त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले जातात ?

मुलीचे बोलणे ऐकून त्रास होते - अक्षय...
अक्षय म्हणाला, "तेव्हा त्रास होतो, जेव्हा माझी 6 वर्षांची मुलगी म्हणते की, ती आमच्यासोबत डिनर करायला बाहेर येणार नाही. कारण तिथे पॅपराजी असतील आणि तिला फ्लॅशलाइट अजिबात आवडत नाही. किंवा मुलगा जेव्हा ट्रेनिंगहून आल्यानंतर चित्रपट पाहायला जात नाही, कारण त्याची इच्छा नसते की, लोकांनी त्याला थकलेले पाहावे. किंवा इंस्टाग्रामवर त्याचा घामाने बरबटलेला फोटो शेअर व्हावा."

अक्षय पुढे म्हणतो, "खरे सांगू तर यासाठी मी त्यांना दोष देणार नाही. स्टार असल्याच्या नात्याने आम्ही तेव्हा तयार असतो. पण जोपर्यंत आमची मुले कॉलेज पूर्ण करून कोणत्याही रूपात लाइमलाइटमध्ये येत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की, त्यांना सार्वजनिक स्वरूपात फॉलो केले गेले पाहिजे. हे माझे मत आहे आणि मी माझ्या मुलांना शिकवतो की, हे तुमच्यावर आहे की, तुम्हाला इतरांच्या बोलण्याने नाराज व्हायचे की नाही."

मुलाच्या ट्रोलिंगबद्दल अक्षय म्हणाला...
जेव्हा अक्षयला विचारले गेले की, त्यांचा मुलगा आरवला अनेकदा ट्रोल केले जाते, त्याच्याविषयी विचित्र कमेंट्स केल्या जातात, तेव्हा तो त्याला कसे प्रोटेक्ट करतो ? उत्तरात अक्षय म्हणाला, "असे लोक जे मुलांना एक्सप्लॉइट करतात, त्यांना स्वतःला आरश्यात पाहून विचारायची गरज आहे की, जर त्यांच्या मुलासोबत असे झाले तर त्यांना कसे वाटेल."

हे अपराधाच्या श्रेणीत यायला पाहिजे - अक्षय...
अक्षय पुढे म्हणाला की, मुले आणि टीनएजर्सला ट्रोल करणाऱ्यांसाठी त्याच्याकडे एकही शब्द नाहीये. अक्षय म्हणाला, "21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींबद्दल सार्वजनिकरित्या वायफळ बोलणे अपराधाच्या श्रेणीत यायला हवे. हे दुःखद आहे की, सोशल मीडिया सारखी महान आणि शक्तिशाली टेक्निक लोक दुसऱ्यांना दुःख पोहोचवण्यासाठी, कमीपणा दाखवणे आणि अपमानित करणे यासाठी वापरतात."

यापूर्वी 'मिशन मंगल' मध्ये दिसलेल्या अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'हाउसफुल 4' 25 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो.

X