आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भयाचा दोषी अक्षय ठाकूरची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली, फाशीच्या शिक्षेला स्थगिती नाहीच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : निर्भया हत्याकांडातील चार दोषींपैकी एक अक्षय ठाकूर याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. न्या. एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ही याचिका विचार करण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट केले. फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासही पीठाने नकार दिला. बुधवारी दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अक्षय ठाकूरने आजारी आईचा संदर्भ देत फाशीऐवजी जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली होती. आता ही याचिका फेटाळली गेल्याने त्याच्याकडे कोर्टाचा कोणताच पर्याय शिल्लक नाही. ताे आता फक्त राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकतो.

पतियाळा हाऊस कोर्टात आज सुनावणी

निर्भयाच्या चारही दोषींनी पतियाळा हाऊस कोर्टात १ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आलेली फाशी स्थगित करावी म्हणून याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होत आहे. तुरुंग प्रशासनाकडून कागदपत्रास विलंब होत असल्याचे कारण सांगून यामुळेच याचिका दाखल करण्यास विलंब होत असल्याचे या दोषींनी याचिकेत म्हटले आहे.

जल्लाद पवन तिहारमध्ये दाखल

दरम्यान, निर्भयाच्या चारही दोषींना फाशी देण्याच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी जल्लाद पवन दिल्लीतील तिहार तुरुंगात दाखल झाला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...