आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay's Announcement, Saying, 'I Will Do The Role Of Prithviraj Chauhan', Sanjay Dutt Was Also Been Selected For The Film.

अक्षयने केली घोषणा, म्हणाला, - 'मीच साकारणार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका', चित्रपटासाठी संजय दत्तचीदेखील झाली निवड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : खिलाडी अक्षय कुमार आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्याने आपला आगामी 'पृथ्वीराज चौहान' चित्रपटाची घोषणा केली. यात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. यशराज बॅनर खाली बनणाऱ्या या चित्रपटाचे डॉ. दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. या चित्रपटावर गेल्या एका वर्षापासून चर्चा सुरू होती, मात्र आतापर्यंत अक्षयने याविषयी कोणतीच घोषणा केली नव्हती. अखेर आपल्या वाढदिवशी त्याने याविषयी अधिकृत घोषणा केली. यशराज बॅनरचा हा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे.
 
 

नोव्हेंबरपासून सुरू होईल शूटिंग
दिग्दर्शन डाॅक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी करत असल्यामुळे अक्षय खुश आहे. कारण डॉक्टर द्विवेदिश यांनीच देशातील सर्वात प्रतिभावंत राजकीय रणनीतिकार चाणक्य यांच्यावर सर्वात माेठी मालिका बनवली हाेती. असाे, हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. याचे शूटिंग या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
 
 
'अक्षयने याविषयी सांगितले, मी भारताच्या सर्वात निडर आणी धाडसी राजापैकी एक असलेले पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते, अशा नायकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी सन्माची गोष्ट आहे. आपल्या देशातील नायकांच्या शौर्याचा आपण जल्लोष साजरा करायला हवा. त्यांनी भारतींयासाठी जे मूल्य स्थापित केले आहेत, त्यांचा आपल्याला आदर करायला हवा. पृथ्वीराज या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे शैार्य आणि धाडसी प्रतिमा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

 
 
या चित्रपटात मोहम्मद गाेरीच्या भूमिकेसाठी संजय दत्तची निवड करण्यात आली होती. मात्र आता ही भूमिका मानव विज साकारणार आहे. संजय दत्तसाठी दुसरी भूमिका निवडण्यात आली आहे.