आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay's 'Housefull 4' Became The First Film To Be Promoted By 'Promotion On Wheels'

अक्षयचा 'हाउसफुल 4' बनला 'प्रमोशन ऑन व्हील्स' द्वारे चित्रपट प्रमोट करणारा पहिला चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : भारतीय रेल्वेने अशातच ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ ही सेवा सुरु केली आहे. जी कला, संस्कृती, खेळ इत्यादींचा प्रचार करण्यासाठी स्पेशल ट्रेन चालवेल. याच अंतर्गत साजिद नाडियादवालाचा चित्रपट 'हाउसफुल 4' पहिला चित्रपट बनला आहे, ज्याला रेलवेच्या या सेवेचा लाभ मिळाला आहे. चित्रपटाच्या कास्टने 16 ऑक्टोबरला मुंबईहून प्रवासाची सुरुवात केली. 

दिल्लीला पोहोचेल हाउसफुल 4 ची टीम... 
चित्रपटाची स्टार कास्ट गुरुवारी या ट्रेनने दिल्लीला पोहोचेल. साजिद नाडियाडवाला म्हणतात, “मी सरकार आणि भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या या नव्या सेवेबद्दल ऐकून खूप खुश आहे. इंडस्ट्री आणि रेल्वे एकत्र आल्यामुळे नवे रस्ते उघडतील आणि कला, संस्कृती आणि भारताच्या इतिहासात अधिक योगदानावाच्या रूपात नवे क्षितिज निर्माण होईल. या संपूर्ण नव्या अनुभवासाठी संपूर्ण कास्ट खूप उत्साहित आहे.”

दिवाळीला रिलीज होईल चित्रपट... 
चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृती खरबंदा, कृती सेनन आणि पूजा हेगड़ेने काम केले आहे. हे 'प्रमोशन ऑन व्हील्स' सोबत नव्या स्टाईलमध्ये चित्रपटाचा प्रचार करणारा पहिला चित्रपट बनला आहे. 

बातम्या आणखी आहेत...