Bollywood / अक्षयच्या 'मिशन मंगल' सोबत होणार प्रभासच्या 'साहो' ची टक्कर, 15 ऑगस्टला रिलीज होतील दोन्ही चित्रपट 

मल्टी स्टारर आहे 'मिशन मंगल'

 

दिव्य मराठी

Jul 05,2019 05:02:44 PM IST

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारने आपला आगामी चित्रपट 'मिशन मंगल'ची रिलीज डेट अनाउंस केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. पण याच दिवशी दोन मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचा क्लॅश होणार आहे. झाले असे की याचदिवशी 'बाहुबली' स्टार प्रभासचा चित्रपट 'साहो' देखील रिलीज होणार आहे.

मल्टी स्टारर आहे 'मिशन मंगल'...
अक्षयचा चित्रपट भारताच्या मिशन ऑफ मार्सच्या कहाणीवर आधारित आहे. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी आणि कीर्ति कुल्हारी सारखे स्टार्स दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्तीने केले आहे.

साहोचे प्रमोशनदेखील झाले सुरु...
बाहुबली फेम प्रभास, श्रद्धा कपूर आणि नील नितिन मुकेश स्टारर 'साहो' देखील 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे पहिले गाणे 'सायको सैयां' चा टीजरदेखील आज रिलीज झाला आहे. मात्र डायरेक्टर सुजीतच्या या चित्रपटाची रिलीज डेट 'मिशन मंगल' व्यापूर्वीच फायनल झाली होती.

'साहो' ची पहिली जाते आहे उत्सुकतेने वाट...
प्रभासचा चित्रपट 'साहो' ची खूप उत्सुकतेने वाट पहिली जाते आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनत असलेला हा चित्रपट तीन भाषांमध्ये तामिळ, तेलगु आणि हिंदीमध्ये एकदाचा शूट झाला आहे. तसेच अक्षयने नेहमीप्रमाणे आपल्या चित्रपटाच्या रिलीजसाठी नॅशनल फेस्टिव्हलची डेट निवडली आहे.

X