आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshya Kumar To Salman Khan Bollywood Celebs Expensive Gifts To Family And Friends

बॉलिवूड स्टार्सचे महागडे गिफ्टः अक्षयने पत्नीला दिली 4 कोटींची कार, कतरिनाला मिळाली सव्वा दोन कोटींची गाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना महागड्या भेटवस्तू देत असतात. कुणी त्याच्या पत्नीला कोट्यवधींची गाडी गिफ्ट करतो, तर कुणी बंगला आणि अंगठी. आज आम्ही तुम्हाला सांगतोय, स्टार्सच्या महागड्या गिफ्टविषयी...

 

- अभिनेता अक्षय कुमारने त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिला सुमारे चार कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल ही कार गिफ्ट केली आहे. अक्षय सध्या त्याच्या आगामी '2.0' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीजर रिलीज झाला असून लवकरच ट्रेलरही रिलीज होणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी रिलीज होत असलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत रजनीकांत आणि अॅमी जॅक्सन मेन लीडमध्ये आहे. 

 

- सलमान खानने बहीण अलविरा हिला एक लग्झरिअस पेंटहाऊस गिफ्ट केले आहे. या पेंटहाऊसची किंमत सुमारे 16 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याने त्याची धाकटी बहीण अर्पिता हिला 3 बीएचके फ्लॅट भेट म्हणून दिला असून त्याची किंमत चार कोटी इतकी आहे. सलमान खान सध्या 'बिग बॉस 12' हा शो होस्ट करताना छोट्या पडद्यावर दिसतोय. शिवाय तो आगामी 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही बिझी आहे. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सेलेब्सच्या महागड्या भेटवस्तूंविषयी...  

बातम्या आणखी आहेत...