आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टने बॅन केल्या 12 हजार वेबसाइट, तरीही ऑनलाइन लीक झाला अक्षय-रजनीचा चित्रपट, अक्षयने अपील करुनही लोकांनी ऐकले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अक्षय कुमार आणि रजनीकांतचा मोस्टअवेटेड चित्रपट '2.0' रिलीज होऊ काही तासच उलटले आहे. पण चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे मेकर्सला मोठे नुकसान होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, चित्रपट तमिलरॉकर्स वेबसाइटवर लीक झाला आहे. पायरेटेड वेबसाइट तमिळ रॉकर्सने ट्विट करुन 2.0 च्या मेकर्सला चित्रपट लीक होण्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे मद्रास हायकोर्टने पायरेसी थांबवण्यासाठी एक दिवसपुर्वीच 12,000 पेक्षा जास्त वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. तरीही हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. 

 

अक्षयने अपील करुनही लोकांनी ऐकले नाही 
फिल्म मेकर्सला नुकसान होऊ नये. यामुळे अक्षय कुमारने चाहत्यांना ऑनलाइन वेबसाइटवर चित्रपट न पाहण्याची अपील केली होती. यासोबतच चित्रपटाची शूटिंग सुरु असताना मेकर्सने चित्रपटासंबंधीत कोणतीही माहिती फोटो आणि व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ न देण्याची काळजी घेतली. याच कारणांमुळे चित्रपट रिलीज होण्यापुर्वी सेटवरुन एकही फोटो लीक झाला नाही. 2.0 ऑनलाइन लीक झाल्यानंतर चाहत्यांनी वेबसाइटविरुध्द अॅक्शन घेणार असल्याचे सांगितले होते. 

 

यापुर्वीही ऑनलाइन लीक झाले आहेत अनेक चित्रपट 
ऑनलाइन चित्रपट लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही अनेक चित्रपट लीक झाले आहेत. यामध्ये  'उड़ता पंजाब', मांझी द माउंटैन मैन, लिपस्टिक अंडर माय बुर्का, अनारकली ऑफ आरा, पार्च्ड, रंगरसिया, साहेब बीवी और गैंगस्टर, बाजीराव-मस्तानी, रेस 3, संजू आणि ठग्स ऑफ हिंदोस्तां सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 

 

अक्षय-रजनी यांचे चाहते म्हणाले चित्रपट नंबर 1 
2.0 चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर यामध्ये वापरण्यात आलेले VFX आणि मॉर्डर्न टेक्नीकची खुप स्तुती होत होती. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपट नंबर 1 असल्याचे चाहते सांगत आहेत. प्रेक्षकांनुसार, चित्रपटामध्ये डायरेक्शनसोबतच एक चांगला मॅसेज देण्यात आला आहे. मोबाइल खुप हानिकारक असतात यामुळे मोबाइलचा वापर कमीत कमी करावा असे चित्रपटामध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच चित्रपटात अक्षय-रजनी यांचा उत्तम अभियन आहे यामुळे प्रेक्षकांना बोर होत नाही. 

 

वर्षातील सर्वात मोठा ओपनर बनू शकतो '2.0'
'2.0' या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरु शकतो असा अंदाज लावला जातोय. ट्रेड एनालिस्ट गिरीश जोहर यांच्यानुसार, फक्त हिंदी बेल्टमध्ये हा चित्रपट 20-25 कोटींचे कलेक्शन करेल. तर सर्व भाषांचे फर्स्ट डे कलेक्शन 100 कोटीपर्यंत पोहोचू शकते. मूळतः तामिळमध्ये तयार झालेला हा चित्रपट 3D कॅमेराने शूट करण्यात आला आहे. हा भारतातील पहिला प्रयोग आहे. भारतात तयार झालेला हा सर्वात महाग चित्रपट आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास 540 कोटी रुपये आहे. 

 

#Tamilrockers 😑😤😤😤 2.0 team Take immediate action pic.twitter.com/yE7deigNB8

— ɴᴀɴᴅʜᴀᴋᴜᴍᴀʀ (@nandhak55941494) November 29, 2018
बातम्या आणखी आहेत...