आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Al Qaeda Chief Ayman Al Zawahiri Releases New Video, Threatens Kashmir And Indian Army

भारतीय लष्कर, सरकार अल-कायदाच्या निशाण्यावर! अल-जवाहिरीने व्हिडिओ जारी करून दिली काश्मीरवरून धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटनांपैकी एक अल-कायदाच्या म्होरक्याचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐमन अल-जवाहिरीने काश्मीरवरून भारताला धमकावले. एवढेच नव्हे, तर आपल्या अनुयायांना भारत सरकार आणि भारतीय सैनिकांवर जास्ती-जास्त हल्ले करण्याचे फरमान दिले आहे. फाउंडेशन फॉर डिफेंस ऑफ डेमोक्रेसीज लाँग वॉर जर्नलने यासंदर्भातील माहिती दिली.


आणखी काय म्हणाला जवाहिरी...
थॉमस जॉस्ली यांनी जर्नलमध्ये लिहिल्याप्रमाणे, अलकायदा काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांच्या विरोधात जिहादसाठी समूहाची स्थापना करत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या वेशात दिसणाऱ्या जवाहिरीने भारताला धमकावले आहे. जवाहिरी म्हणाला, 'काश्मीरमध्ये मुजाहिद्दीनने किमान भारतीय लष्कर आणि सरकारवर हल्ले करत राहण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था खालावेल आणि देशात जास्तीत-जास्त मानवी आणि वित्तहानी होत राहील.' जवाहिरीच्या व्हिडिओमध्ये भारतात अलकायदाचा म्होरक्या जाकिर मूसाचा फोटो सुद्धा दिसून आला. मूसाला भारतीय सैनिकांनी दोन महिन्यांपूर्वीच कंठस्नान घातले आहे.


अमेरिकेचे चमचे आहेत पाक सरकार आणि पाकिस्तानी सैनिक -जवाहिरी
जवाहिरीने आपल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानवर देखील टीका केली. पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर अमेरिकेचे चमचे आहेत. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानातील सरकार आणि लष्कर दहशतवाद्यांचा राजकीय गरजेसाठी वापरतात असेही जवाहिरी म्हणाला.