Home | International | Other Country | al qaida terrorist organisation related indian software engineer arrested in france

अल कायदाशी संबंधाच्या आरोपावरून भारतीय इंजिनियरला फ्रान्समध्ये अटक

Agnecy | Update - May 22, 2011, 11:31 AM IST

अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे.

  • al qaida terrorist organisation related indian software engineer arrested in france

    पॅरिस - अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे.

    या इंजिनिअरवर युवकांना भडकावून दहशतवादी संघटनेत सहभागी करीत असल्याचा आरोप आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो भारतात आपल्या आईला बघण्यासाठी आला नव्हता. मदुराई येथील रहिवासी असलेला मोहम्मद नियाज असे या इंजिनियरचे नाव असून, त्याचे पाकिस्तानमध्ये सतत ये-जा सुरु होती. त्याचे शिय्या मुस्लिम विरोधी असलेली जुनैदुल्ला या संघटनेशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. या संघटनेला अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणण्यात आले आहे. नियाज गेल्या अनेक वर्षांपासून फ्रान्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरचे काम करीत आहे. त्याच्याजवळ भारतीय पासपोर्ट असून, तो सहा महिन्यांपूर्वी भारतात आला होता. भारतीय अधिकाऱ्यांना मात्र त्याच्याबाबतीत कोणतीही संदिग्ध गोष्ट आढळून आलेली नाही.

Trending