Home | International | Other Country | Alabama's governor Kyi Eave signed the 'Chemical Castration' Bill

या देशात लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींना नपुंसक बनवण्याची शिक्षा, बहुमताने कायद्याला मंजुरी

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 04:31 PM IST

बाल लैंगिक शोषणात दोषी आढळल्यास केमिकलने बनवले जाणार नपुंसक

 • Alabama's governor Kyi Eave signed the 'Chemical Castration' Bill

  मोन्टगोमॅरी(अल्बामा)- येथे लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढले असून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता प्रशानाने यावर कठोर शिक्षा करण्यासाठी अंमवबजावणी सुरू केली आहे. सोमवारी अल्बामाच्या गव्हर्नर काय इव्हे यांनी केमिकल कॅस्ट्रेशन विधेयकावर स्वाक्षरी केली. या विधेयकात 13 वर्षांखालील मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना नपुंसक बनवण्याची तरतूद आहे. तसेच, अशा प्रकारचा कायदा करणारे अल्बामा अमेरिकेतील पहिलेच राज्य ठरले आहे.

  इंजेक्शनचा खर्च आरोपीला करावा लागणार
  या शिक्षेमध्ये किती प्रमाणात औषधी द्यायची आहे, हे न्यायाधीश ठरवतील. पण, याचा खर्च आरोपीलाच करावा लागेल. हे विधेयक रिपब्लिकन प्रतिनिधी स्टीव्ह हर्स्टद्वारे मांडण्यात आले होते. तसेच, या विधेयकाला अल्बामाच्या दोन्ही संसदेत मंजुरी मिळाली आहे.

  गव्हर्नर काय इवेनुसार, अशा घृणास्पद गुन्ह्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा करावी लागेल, तरच गुन्हेगारांच्या मनात भिती निर्माण होईल. सध्या गुन्हेगारांच्या मनात कोणतीच भिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत.

  नवीन कायद्यानुसार, दोषींना ताब्यातून मुक्त करण्यापूर्व किंवा पॅरोल देण्याच्या एका महिण्यापूर्वी या औषधाचे इंजेक्शन दिले जाईल. त्यामुळे शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन निर्माण होणार नाही. त्यासोबतच, आरोपींच्या शरीरात इतर हार्मोन्स टाकण्यात येतील.

  काही कायदेतज्ञांनी व्यक्त केली चिंता
  येथील अनेक राज्यांनी कैद्यावर रासायनिक औषधांच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. या राज्यांनुसार, या औषधाचा किती वेळेस उपयोग होणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे काही कायदेशीर गटांनी बळजबरीने दिल्या जाणाऱ्या या औषधावर चिंता व्यक्त केली.

  बाललैंगिक शोषण प्रकरणात नपुंसक बनवण्याची शिक्षा दक्षिण कोरियामध्ये 2011 आणि इंडोनेशियामध्ये 2016 पासून दिली जाते. तेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांनी, बाल लैंगिक अत्याचाराबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

Trending