आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malaika Arora Party With Girl Gang: Malaika Discounts In Her Yoga Classes For One Year Membership

कमाईसाठी योगा क्लासेस चालवत आहे मलायका अरोरा, महिन्याभरापुर्वीच केले सुरु: Yoga Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. मलायका अरोरा फिटनेसविषयी खुप अॅक्टिव्ह राहते. याच कारणांमुळे तिने गेल्या महिन्यात 18 अक्टोबरला मुंबईमध्ये आपले योगा सेंटर ओपन केले. मलायकाचे हे योगा सेंटर तिच्या इनकमचा नवीन सोर्स आहे. महिनाभरापुर्वीच उघडलेल्या या योगा सेंटरच्या क्लाससाठी तिने आता डिस्काउंट देणे सुरु केले आहे. महिलांना ती वर्षभराच्या मेंबरशिपमध्ये पुर्ण 10 हजार रुपये डिस्काउंट देणार आहे. याची माहिती स्वतः मलायकाने सोशल मीडियावर दिली. यासोबतच मलायकाने फ्रेंडसोबत पार्टी करताना काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती मस्ती करताना दिसतेय. 


बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे मलायका 
- सध्या मलायका आपल्या 13 वर्षे लहान बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे चर्चेत आहे. नुकतेच हे दोघं करीना कपूर-अमृता अरोरासोबत पार्टी करताना दिसले होते. या पार्टीमध्ये दोघांचे जवळीक दाखवणारे फोटोजही व्हायरल झाले होते.
- अर्जुनसोबतची रिलेशनशिप मलायकाने अजुनही स्विकारलेली नाही. तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, तिला पर्सनल आयुष्यावर बोलणे आवडत नाही. ती म्हणाली होती की, मी माझे आयुष्य एन्जॉय करत आहे. माझ्या आयुष्यात काय सुरु आहे हे सर्वांना माहिती आहे. 
- 23 अक्टोबरला मलायकाचा 45 वा वाढदिवस होता. या निमित्ताने अर्जुन आणि मलायका एकत्र इटलीमध्ये गेले होते. त्यांनी तिथेच वाढदिवस साजरा केला. मिलान एयरपोर्टवरुन मलायका आणि अर्जुनचा हातात हात घातलेला फोटो समोर आला होता. नंतर ते एकाच फ्लाइटने भारतात परतले. पण भारतात आल्यावर ते एकमेकांपासून दूर झाले. 
- गेल्या महिन्यात अर्जुन कपूर 'नमस्ते इंग्लँड'च्या प्रमोशनसाठी 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पोहोचला तेव्हा संपुर्ण शूट दरम्यान ते दोघं एकत्र होते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मलायका अरोराचे Photos...
 

बातम्या आणखी आहेत...