आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकी खेळीतून कुकने केले चाहत्यांना अलविदा; इंग्लंडचा दुसरा डाव ४२३ धावांवर घाेषित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- यजमान इंग्लंडचा माजी कर्णधार अाणि सलामीवीर कुकने (१४७)  अापल्या शेवटच्या कसाेटीत शानदार शतकी खेळी केली अाणि अापल्या तमाम चाहत्यांना अलविदा केले. त्याची करिअरमधील ही शेवटची कसाेटी हाेती. त्याने भारताविरुद्धच्या या कसाेटीत प्रत्येकी एक शतक अाणि अर्धशतक ठाेकले.  इंग्लंडचा ३३ वर्षीय कुक हा ३३ व्या शतकासह निवृत्त झाला. 


इंग्लंड संघाने पाचव्या कसाेटीचा दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घाेषित केला. यासह इंग्लंडने ४६४ धावांची अाघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात दिवसअखेर ३ बाद ५८ धावा  काढल्या. पुजारा, काेहली शून्यावर बाद झाले. भारत अद्याप ४०६ धावांनी पिछाडीवर अाहे. यातून भारतावर अाता पराभवाचे सावट निर्माण झाले अाहे.  

बातम्या आणखी आहेत...