Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | alcohol bottles to carry health warning messages must

मद्याच्या बाटलीवर मातृभाषेतून द्यावा लागणार धोक्याचा इशारा

प्रतिनिधी | Update - Mar 15, 2019, 09:50 AM IST

1 एप्रिलपासून संपूर्ण तपशील मद्याच्या बाटलीवर द्यावा लागेल 

 • alcohol bottles to carry health warning messages must

  जळगाव - अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने प्रत्येक मद्यपेय बाटलीवर ‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक, सुरक्षित राहा, मद्यपान करून गाडी चालवू नका’ ही वाक्ये मातृभाषेतून लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार असल्याने राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषधी प्रशासनाकडून याविषयी तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या राज्याच्या राज्य शुल्क उत्पादक आयुक्त आणि अन्न विभागाच्या आयुक्तांची बैठक बुधवारी झाली.


  बैठकीत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे मद्यपेय मानक नियम २०१८द्वारे ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणाने करण्याबाबत चर्चा झाली. २००६च्या निर्णयाप्रमाणे सर्व प्रकारची मद्यपेय आता अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या कक्षेत आलेले आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणात ठरवून दिलेले नियम पालन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.


  राज्य उत्पादन शुल्क करणार तपासणी : उत्तम गुणवत्ता दाखवण्यासाठी मद्यपेय उत्पादक ब्रिटिश मानक संस्थेकडून प्रामाणिकृत असल्याचे लेबल अंकित करतात. आता मात्र, तसे करणे अवैध मानले जाईल. उत्पादकांना अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण विभागाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यपेय निर्मित उत्पादकांशी, भागधारकांशी, किरकोळ विक्रेत्यांशी बैठकी घेऊन त्यांना याबाबत अवगत केलेले आहे.


  १ एप्रिलपासून संपूर्ण तपशील बाटलीवर द्यावा लागेल
  मद्यपेय बाटलींच्या बाहेरील बाजूस मद्यात समाविष्ट असलेले घटक, प्रमाण, ॲलर्जिक, वैधानिक चेतावणी नमूद करणे आवश्यक आहे. ‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक, सुरक्षित राहा, मद्यपान करून गाडी चालवू नका’ असे १ एप्रिल २०१९ पासून प्रत्येक मद्यपेयावर लिहिणे बंधनकारक असेल. ही वाक्य इंग्रजीसह मातृभाषेत लिहिणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Trending