आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वीत शिकणाऱ्या विद्याथिनीने बनवले अल्कोहोल सेन्सर किट, मद्यपी चालक गाडीत अथवा दुचाकीवर बसताच ती स्टार्टच होत नाही

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ७० ते ८० टक्के अपघात केवळ चालकाने मद्यपान केल्यामुळे घडतात

सम्मेद शहा

पापरी- येथील कै. सुरेश भोसले प्रशालेच्या विद्यार्थिनीने विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अल्कोहल सेन्सरच्या मदतीने मद्यपान केलेले चालक गाडीवर अथवा गाडीत बसताच ती चालु न होणारे उपकरण तयार केले आहे. पोखरापूर येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रात्यक्षिकसाठी सध्या हे उपकरण असून विद्यार्थिनी व शिक्षक प्रदर्शन पहावयास आलेल्याना या संदर्भात माहिती देत आहेत.पापरी येथील कै. सुरेश भोसले प्रशालेतील ९वी मधील विद्यार्थिनी साक्षी भोसलेने प्रशालेतिल विज्ञान शिक्षक सुनील शहा व धनंजय मुळे यांच्या मार्गदर्शनाने सेन्सर, एक आय सी, इंडक्शन क्वाइल, ट्रांसफॉर्मर, डेमो दाखवन्यासाठी खेळण्यातील रिमोट वर चालनारी चार चाकी गाडी हे साहित्य वापरून हे उपकरण तयार केले. या उपकरणाला एक हजार रुपयांचा खर्च आला आहे. दारुचा वास ओळखून संबंधित वाहन कंट्रोल करणारे हे उपकरण बनवले आहे.


एखादा वाहन चालक मद्यपान करुन गाडीत बसला व विद्यार्थिनीनी बनविलेले हे अल्कोहल सेन्सर  उपकरण किट त्या सम्बन्धित गाडीत बसविलेले असल्यास ती गाड़ीच स्टार्ट होत नाही. हे उपकरण चारचाकी, दुचाकीला ही बसवता येवू शकते.
वर्षात ७० ते ८० टक्के अपघात केवळ चालकाने मद्यपान केल्यामुळे घडत आहेत. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे, त्यात अनेक निरापराधही बळी जात असतात, हजारो कुटुंबिय उध्वस्त होत आहेत म्हणून आम्ही काळाची गरज ओळखून सदर उपकरण बनविले आहे, जर हे उपकरण चार चाकी दुचाकी वाहनास बसविले तर अपघातास आळा बसेल.- सुनील शहा( विज्ञान शिक्षक ,पापरी)