आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिलेश पाटील
नवापूर - महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात दारू तस्करीला उत आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र राज्यातून दारू खरेदी करून गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील सुबीर येथे अवैधरीत्या दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना कारवाई करण्यात आली. नवापूर तालुक्यातील नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर दारूने भरलेली कार व चालकाला नवापूर पोलीसांनी पकडले आहे. यात 80 हजार रूपयांचा मुद्देमाल नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी जप्त केला आहे. दारू तस्करी संदर्भात नवापूर पोलीसांना कारवाई करण्यास यश मिळत आहे. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांना अपक्ष दारू प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र विभाग असताना एवढा हलगर्जीपणा का? हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.
नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास गुजरात राज्यात दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी सापळा रचला. दरम्यान नवापुर ते पिंपळनेर रोड दरम्यान वावडी फाटा येथे संशयित वाहनाला थांबून कारची तपासणी केली असता त्यात 50 हजार 184 रुपये किंमतीची इम्पीरियल ब्ल्यू कंपनीचे विदेशी दारुचे 750 मिलीचे 12 बाटल्या, एवर्डस 5000 कंपनीच्या बियरच्या 650 मिली प्रमाणाच्या 48 बाटल्या व एवर्डस 5000 कंपनीच्या बियरच्या 500 मिली प्रमाणाच्या 216 टिन व देशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या प्लास्टीकच्या व काचेच्या एकुण 288 बाटल्या अशी 50,184 रुपयांचा किंमतीची विदेशी दारु व मारुती 800 कंपनीची जी जे 19 ए 2161 तिची किंमत 30,000 असा एकुण 80 हजार 184 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी मनश्या बैजु म्हात्रे (वय 36, रा. दहेल, ता. सुबीर, जि. डांग, गुजरात)याला ताब्यात घेण्यात आले आहे.
80 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
नवापुर पोलीसांचा अवैध दारू संदर्भात झपाट्याने दारू पकडण्याची करवाई करत आहे. यापु्र्वीही लोकसभा, विधानसभा व नगरपालिका आचारसंहीता काळात अवैध दारुवर मोठी कार्यवाही केली आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत,डि.एस.शिंपी,कृष्णा पवार, गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे यांनी केलेली आहे. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास कृष्णा पवार हे करीत आहे.
दारू तस्करीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
नवापूर तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध दारू वाहतूक, तस्करी, विक्री करणाऱ्या दारू माफियावर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. गुजरात राज्यात दारू बंदी असल्याने गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात असलेल्या नवापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. याकडे वरिष्ठांना लक्ष देणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.