Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Alert : Causes, Symptoms, and Prevention of Malaria disease

अलर्ट : जाणून घ्या मलेरिया होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 30, 2019, 01:06 PM IST

​​​​​​​मलेरियापासून वाचण्यासाठी तुम्हीही अवलंबा ही पद्धत  

 • Alert : Causes, Symptoms, and Prevention of Malaria disease

  हेल्थ डेस्क : भारतामध्ये प्रत्येकवर्षी मलेरियामुळे दोन लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. वर्ल्ड हेलट्ठ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, दरवर्षी सुमारे 2,05,000 मृत्यू मलेरियामुळे होतात. या घातक आजाराचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होतो. 55,000 मुले जन्माच्या काही वर्षातच अनेक मुले काळाच्या पडद्याआड जातात. 30 हजार मुले पाच ते 14 वर्षे वयात मलेरियामुळे आपला जीव गमावतात. 15 ते 69 वर्षे वयाची 1,20,000 व्यक्तीदेखील या आजाराची शिकार होतात. सामान्यतः मलेरिया संक्रमित डास चावल्यामुळे होतो.

  जाणून घ्या कशामुळे होतो मलेरिया...
  मलेरिया एक असा आजार आहे, जो संक्रमित डासांमध्ये असलेल्या परावलंबी विषाणूमुळे होतो. हे विषाणू एवढे छोटे असतात की, आपण याला पाहू शकत नाही. मलेरिया हा ताप प्लॅस्मोडियम व्हीव्हॅक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. ऍनाफिलीस नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चावण्यामुळे मनुष्याच्या रक्त प्रवाह्यामध्ये हा व्हायरस जातो आणि केवळ तोच डास व्यक्तीला मलेरिया पीडित बनवू शकतो, ज्याने आधी एखाद्या मलेरिया संक्रमित व्यक्तीला चावले असेल. हा विषाणू लिव्हरपर्यंत जाऊन त्याच्या काम करण्याच्या क्षमतेला बिघडवतो.

  मलेरियाची लक्षण खालीलप्रमाणे आहेत...

  - खूप ताप.

  - शरीर थरथरणे.

  - घाम येणे.

  - डोकेदुखी.

  - अंगदुखी.

  - मळमळ होणे आणि उलटी होणे.

  कधी कधी ही लक्षणे प्रत्येक 48 ते 72 तासांमध्ये पुन्हा पुन्हा दिसतात.

  अशा प्रकारे करावा या आजाराला प्रतिबंध...

  - मच्छर-दानी लावून झोपावे आणि आसपासची जागा स्वच असणे गरजेचे आहे.

  - साधारणतः मलेरियाचे डास संध्याकाळी चावतात.

  - घरात डास मारण्याची औषधे आणि मस्क्युटो रिपेलंटचा वापर करावा.

  - घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावावी आणि AC किंवा पंख्याचा वापर करावा, जेणेकरून डास एकाजागी बसू नयेत.

  - असे कपडे घालावे, ज्याने तुमचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल आणि त्याचा रंग फिका असावा.

  - अशा जागी जाऊ नये, जेथे झाडे असतील, कारण तिथे डास असू शकतात.

  - अशा ठिकाणी जाऊ नये, जिथे पाणी साचलेले असेल कारण तिथे हे डास असण्याची दाट शक्यता असते.

Trending