आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - मोफत इंटरनेट, कॉलिंग आणि व्हॅल्यू अॅडेड सेवांची सवय लावणाऱ्या मोबाईल कंपन्या आता ग्राहकांना झटका देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मोफत इनकमिंग कॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी इनकमिंग सेवा 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन लाँच केले आहेत. आता ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठी रिचार्ज करावाच लागेल. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्यांनी स्पर्धेच्या नादात अगदी मोफत किंमतींमध्ये प्लॅन दिले. आता या दरम्यान झालेला तोटा भरून काढण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी मिनिमम प्लॅन्स जारी केले आहेत.
व्हॅलिडीटी प्लॅनमध्ये बदल
एअरटेल, व्होडाफोन आपल्या सरासरी रेव्हेन्यु (ARPU) ला वाढवण्यावर जोर देत आहेत. तर त्यांचा फोकस अशा ग्राहकांवर आहे, जे त्यांना फायदा मिळवून देतात. टेलिकॉम कंपन्यांनी इनकमिंग सेवेसाठी 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन लाँच केले आहेत. कंपन्यानी यासाठी तीन प्रकारचे प्लॅन जाहीर केले. त्यात 35 रुपये, 65 रुपये आणि 95 रुपयांचे प्लॅन आहेत. तिन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. 29 व्या दिवशी रिचार्ज केला नाही तर इनकमिंग सेवा सुद्धा बंद होईल. कंपन्यानी अशा ग्राहकांची यादी तयार केली आहे जे फक्त इनकमिंगचा वापर करायचे आणि गरज पडल्यावरच रिचार्ज करायचे. अशा यूझर्समुळे कंपनीच्या ARPU ला नुकसान होत होते.
किती दिवसांत बंद होइल इनकमिंग?
रिचार्ज केल्यानंतर 45 दिवस इनकमिंग सर्विस बंद होणार नाही. पण, त्यानंतर रिचार्ज केला नाही, तर सर्विस बंद केली जाईल.
कणता आहे मिनिमम प्रीपेड प्लॅन?
एअरेटल, व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी मिनिमम किंमतीचा प्लॅन सुरू केला आहे. तो 35 रुपयांचा आहे. त्यात ग्राहकाला 26 रुपयांचे बॅलेंस मिळेल. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. व्होडाफोनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की कंपन्यांना यापेक्षा कमी वेळात नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, अनेक असे प्रीपेड ग्राहक आहेत जे इनकमिंग कनेक्शनवर विसंबून राहतात. अनेक जण कॉलिंगसाठी दुसरा सिम वापरतात. अशात ते इनकमिंगसाठीच्या सिम कार्डवर रिचार्ज करत नाहीत. त्याचा कंपनी आणि ग्राहक अशा दोहोंना नुकसान होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.